Raw Papaya Benefits : तब्येत बिघडू द्यायची नसेल किंवा तब्येत नेहमीच चांगली ठेवायची असेल तर एक्सपर्ट सगळ्यात पहिला सल्ला देतात तो डाएट सुधारण्याबाबत. म्हणजे एक्सपर्ट नियमितपणे पालेभाज्या आणि वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देतात. कारण भाज्या आणि फळांमधून शरीराला आवश्यक असे अनेक पोषक तत्व मिळतात. सामान्यपणे सगळेच लोक पिकलेली फळं खातात. पण अशीही काही फळं असतात जी कच्ची खाऊनही फायदे मिळतात. असंच एक फळ म्हणजे पपई.
कच्ची पपई आरोग्यासाठी खूप जास्त गुणकारी मानली जाते. कच्च्या पपईनं पचनक्रिया चांगली होते. यात व्हिटामिन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसेच यात पॅपेन नावाचं एक एंझाइम्स असतं, जे पचन चांगलं करण्यासोबतच शरीराची सूज कमी करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. तसेच कच्ची पपई त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असते.
कच्च्या पपईचा जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आज आम्ही तुम्हाला कच्च्या पपईच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. सोबतच हेही सांगणार आहोत की, कच्च्या पपईचा डाएटमध्ये कसा समावेश करावा.
कच्ची पपई खाण्याचे फायदे
- कच्ची पपई खाल्ल्यानं पचन तंत्र मजबूत होतं. पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, सूज आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासही पपई फायदेशीर ठरते.
- कच्च्या पपईमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामिन सी असतात, ज्यामुळे त्वचा ग्लोईंग होते. सोबतच सुरकुत्याही कमी होतात.
- कच्च्या पपईनं शरीरातील सूज कमी होते. तसेच संधीवात असेल तर त्यातही आराम मिळतो.
- कच्ची पपई खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुमचं ओव्हरईटिंग टाळलं जातं. यानं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
- कच्च्या पपईनं हाडंही मजबूत होतात.
- तसेच कच्ची पपई नियमित खाल तर केसही मजबूत होतात. सोबतच केसांची वाढही वेगानं होते.
- कच्च्या पपईनं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होते. डायबिटीसच्या रूग्णांसाठी कच्ची पपई खूप फायदेशीर ठरते.
कशी खाल?
कच्ची पपई तुम्ही सलादच्या रूपातही खाऊ शकता
कच्च्या पपईचा पराठा सुद्धा टेस्टी लागतो
कच्च्या पपईची भाजी सुद्धा टेस्टी लागते
कच्च्या पपईचा ज्यूसही तुम्ही पिऊ शकता
कच्च्या पपईचं लोणचे देखील केलं जातं