Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राच्या आईने टोचून घेतले चेहऱ्यावर बोटोक्स इंजेक्शन, मधू चोप्रांचा व्हायरल व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:18 IST

Piyanka's mother Madhu Chopra get Botox injections on her face : या व्हिडिओमध्ये मधू चोप्रानं सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर डॉट्स तयार करून घेतले. त्यानंतर हळूहळू डोळ्यांच्यावर कपाळ आणि हनूवटीवर इंजेक्शन लावले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री, ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सिनेसृष्टीत एक्टिव्ह नसली तरी ती कायम चर्चेत असते. यासोबतच तिचे कुटुंबियसुद्धा चर्चेत असतात. प्रियांका चोप्राचे वडील अशोक चोप्रा भारतीय सेनेत डॉक्टर होते तर आई डॉ. मधु चोप्रा ईएनटी स्पेशालिस्ट म्हणजेच नाक, कान आणि गळ्याच्या  विशेषज्ञ आहेत. मधु चोप्रा या मुंबईच्या जुहूमध्ये  एस्थेटिक नावानं आपलं क्लिनिक चालवतात. सोशल मीडियावरही त्या बऱ्याच एक्टिव्ह असतात. आपल्या कामाशी निगडीत महत्वपूर्ण माहिती त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Piyanka's mother Madhu Chopra get Botox injections on her face)

अलिकडेच मधु चोप्रानं यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केली आहे. या व्हिडिओत त्यांनी आपल्या चेहऱ्यावर बोटोक्स इंजेक्शनची पूर्ण प्रक्रिया दाखवली आहे.  ही ट्रिटमेंट त्यांनी कोणाकडून करून न घेता स्वत:स्वत:च्या चेहऱ्यावर केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी सोप्या पद्धतीनं बोटोक्स कधी कसं करावं याबाबत माहिती दिली आहे.

चेहऱ्याच्या या भागांवर इंजेक्शन्स लावले

 या व्हिडिओमध्ये मधू चोप्रानं सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर डॉट्स तयार करून घेतले. त्यानंतर हळूहळू डोळ्यांच्यावर कपाळ आणि हनूवटीवर इंजेक्शन लावले आहे. त्यांनी सांगितले की ही प्रक्रिया इतकी वेदनादायक नसते जितका लोक याबाबत विचार करतात. या ट्रिटमेंटचा परिणाम  ३ ते ४ दिवसांत दिसायला सुरूवात होते. 

बोटोक्साबाबतचे गैरसमज काय आहेत?

आजकाल बरेच लोक पूर्ण माहिती समजून न घेता लोकल ठिकाणांहून बोटोक्ससारख्या गंभीर ट्रिटमेंट्स करतात.  डॉ. मधु चोप्रा यांनी सांगितले की लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो की बोटोक्स केल्यानंतर चेहरा एकदम फ्रिज किंवा प्लास्टीकसारखा दिसतो. त्यांच्यामते असं तेव्हाच होते जेव्हा बोटोक्स कोणत्याही अनुभव नसलेल्या व्यक्तीकडून केले जाते. पण  डॉक्टरांनी योग्य प्रमाणात बोटोक्स लावले तर चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसतो.  मधु चोप्रा यांनी चेहऱ्याशी निगडीत कोणतीही ट्रिटमेंट करताना घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. नेहमीच अनुभवी डॉक्टरकडून बोटोक्स किंवा इतर ट्रिंटमेट करून घ्याव्यात. इंटरनेटवरचे ट्रेंड्स फॉलो करून काही चुकीच्या ट्रिटमेंट्स घेतल्या तर गंभीर समस्या उद्भवू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra's Mother, Dr. Madhu Chopra, Shares Botox Injection Video

Web Summary : Dr. Madhu Chopra, Priyanka's mother, shared a video demonstrating her administering Botox injections on herself. She highlighted the procedure's simplicity and addressed common misconceptions, emphasizing the importance of seeking treatment from experienced professionals to avoid complications and achieve natural-looking results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी