सध्या एका लग्नाची गोष्ट सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. ते लग्न म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचं. आता प्रियांका म्हणजे बॉलीवूडचं एक बडं प्रस्थ. त्यामुळे तिच्या भावाच्या लग्नाचीही जबरदस्त चर्चा झाली. अगदी नीता अंबानी, श्लोका मेहता, रेखा अशा मातब्बर मंडळींची या लग्नाला उपस्थिती होती. लग्नात प्रियांका चोप्रा हिच्यासह नवरदेव आणि नवरी यांच्या दिसण्याचं, त्यांच्या सौंदर्याचं खूप कौतूक झालं. पण लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी प्रियांकाच्या वहिनीने म्हणजेच नीलम उपाध्याय हिने तिचे काही फोटो साेशल मिडियावर शेअर केले असून यामध्ये तिने तिच्या खांद्यावर, मानेवर आलेले लालसर चट्टे दाखवले आहेत. ते पाहून सगळेच जण खूप अचंबित झाले असून ती हळदीची ॲलर्जी असावी असा तिचा अंदाज आहे.(Priyanka Chopra's 'Bhabhi', Neelam Upadhyay Faces Skin Allergy After Applying 'Haldi' Paste In Pre-Wedding)
आपल्याकडे लग्नाच्या आधी एक विधी हमखास केला जातो आणि तो विधी म्हणजे नवरा आणि नवरीला हळद लावणे. सिद्धार्थ आणि नीलमचा हळदीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात झाला. नीलम म्हणते आहे की या कार्यक्रमापुर्वी तिने हळदीची थोडी पेस्ट अंगाला लावून पॅच टेस्ट केली होती.
गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही? ४ साध्या सोप्या टिप्स- ५ मिनिटांतच पोट साफ होईल
त्यावेळी तिला असा कोणताही त्रास झाला नाही. पण त्यानंतर मात्र आता तिच्या अंगावर असे चट्टे आले असून ती त्यावर काय उपाय करता येईल असं विचारते आहे. सिद्धार्थ आणि नीलमच्या हळदीचा कार्यक्रम ओपन एअरमध्ये झाला. यावेळी हळदीमधील काही घटकांची थेट पडलेल्या सुर्यप्रकाशामुळे रिॲक्शन झाली आणि त्यातून तिला हा त्रास झाला असावा, असं काहींचं म्हणणं आहे.
डॉ. अनिल गंजू यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार हळद प्रत्येकाच्याच त्वचेला सहन होईल असे नसते. त्वचेचा काही आजार असेल तर किंवा त्वचा खूप जास्त संवेदनशील असेल तर असा त्रास होऊ शकतो.
प्रेशर कुकरचा स्फोट का होतो? रोज कुकर वापरूनही बहुतांश महिलांना माहितीच नाहीत 'ही' कारणं
म्हणून आता लग्नसराईमध्ये ज्या नवरदेव, नवरीच्या अंगाला हळद लागणार आहे त्यांनी खोबरेल तेल किंवा त्यांचं नेहमीचं मॉईश्चरायझर लावून त्वचा आधी व्यवस्थित मॉईश्चराईज करून घ्यावी आणि त्यानंतरच हळद लावावी. यामुळे हळदीचा त्वचेशी थेट संपर्क येऊन असे काही प्रकार होणार नाहीत.