Join us

फेशियल वॅक्स करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, त्वचेचं होणार नाही नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:10 IST

Skin Care Tips : फेशियल वॅक्सिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. अशात चला जाणून घेऊ वॅक्सिंग करताना काय काळजी घ्याल. 

Skin Care Tips : अनेक महिलांच्या चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. हे केस दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापरही केला जातो. पण त्यांचे साइड इफेक्ट्सही भरपूर असतात. अशात अनेक महिला चेहऱ्यावर वॅक्सिंग करून केस दूर करतात. पण फेशियल वॅक्सिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. अशात चला जाणून घेऊ वॅक्सिंग करताना काय काळजी घ्याल. 

स्किन इन्फेक्शन टाळण्यासाठी

फेशिअल वॅक्सिंग प्रत्येकाना सूट होईल असं नाही. तुम्हाला जर स्किन इन्फेक्शन असेल किंवा चेहऱ्यावर पुरळ असेल तर वॅक्स करणं टाळलं पाहिजे. जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त केस असतील आणि हे जेनेटिक असतील किंवा एखाद्या हार्मोनल असंतुलनामुळे आले असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने लेजरचा पर्याय निवडावा. जर तुमच्या हनुवटीवर किंवा गालांवर दाढीसारखे केस येत असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 

फेशियल वॅक्स

चेहऱ्यावर वापरलं जाणारं वॅक्स, दुसऱ्या वॅक्सपेक्षा वेगळं असतं. हे फार मुलायम असतं, जेणेकरून स्किनवर रॅशेज येऊ नये आणि जळजळ होऊ नये. चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी ज्या वॅक्सचा वापर  केला जातो त्यात अॅलोव्हेरा, मध असतं. जेणेकरून त्वचेचं कमीत कमी नुकसान व्हावं. तसेच असं असावं जे जास्त दिवस चावालं.

वॅक्स करण्याची पद्धत

अनेकजण घरीच वॅक्स करतात. पण चेहऱ्यावर वॅक्स करणं इतकं सोपं नसतं. चेहऱ्यावर वॅक्स करण्याआधी हे तपासून बघा की, तुम्हाला योग्यप्रकारे वॅक्स करता येतं का? येत नसेल तर स्किनचं नुकसान होऊ शकतं. वॅक्सचं टेम्प्रेचर, स्ट्रिप सगळं काही योग्य असावं.

हेही ठेवा लक्षात

फेशियल वॅक्स केल्यानंतरही त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. वॅक्स केल्यानंतर कोणतंही चांगलं मॉइश्चरायजर लावा. त्यासोबतच साबणाऐवजी चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करावा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स