प्रार्थना बेहेरे या अभिनेत्रीचं नाव फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही. तिची ओळख अख्ख्या भारतभर आहे. कारण वयाच्या अवघ्या १६- १७ व्या वर्षी पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली होती. प्रत्येक भूमिका आपल्या खास शैलीतून साकारणे हे तिचं वैशिष्ट्य. त्यामुळेच ती प्रेक्षकांच्याही कायम लक्षात राहाते. यासोबतच तिची एक गोष्टही तिच्या चाहत्यांना खूप भावते आणि ती म्हणजे तिचं सौंदर्य.. गुलाबी गाल, बोलके डोळे, चमकदार त्वचा आणि मस्त केस... अशा थाटातली प्रार्थना नेहमीच आकर्षक दिसते. आता तिच्यासारखं सौंदर्य मिळविण्यासाठी कित्येक जणींची धडपड सुरू असते. पण तिने मात्र त्यासाठी एकच साधा आणि सोपा उपाय सांगितला आहे.(Beauty Tips Shared By Prarthana Behere)
काय आहे प्रार्थना बेहेरेचं ब्यूटी सिक्रेट?
प्रार्थना बेहेरेच्या मुलाखतीचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने तिच्या इतरही काही ब्यूटी टिप्स शेअर केल्या आहेत. पण त्यामधली तिने सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा आनंद..
फक्त १ चमचा भोपळ्याच्या बिया रोज खा, ५ जबरदस्त फायदे, केस आणि त्वचाही होईल सुंदर
ती म्हणते की सौंदर्य हवं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही खुष, आनंदी राहायला सुरुवात करा. तुम्ही मनातून आनंदी असाल, समाधानी असाल तर त्याचं वेगळंच तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतं. ही गोष्ट ती तिच्या आई- वडिलांकडून शिकली आहे. कारण त्यांचीही त्वचा खूप छान आहे, आणि तिच्यामते त्यांच्या मनातला आनंद हेच तिच्या पालकांच्या आणि तिच्या स्वत:च्याही सौंदर्याचं सिक्रेट आहे...
प्रार्थना म्हणते त्यात खरोखरच खूप तथ्य आहे. एखाद्यावेळी स्वत:वरच असा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. ज्यावेळी सगळं काही तुमच्या मनासारखं घडत असेल, जेव्हा तुम्ही स्वत:वर, आजुबाजुच्या लोकांवर प्रचंड खुश असाल तेव्हा तुमचा चेहरा एकदा आरशात पाहा..
लग्नाच्या पंगतीत असतो तसा बुंदी रायता करा घरीच, हलवाईने सांगितल्या ४ टिप्स, रायता होईल चटपटीत
खूप तेजस्वी दिसेल. डोळे चमकदार होतील. तेव्हा तुम्हाला कोणत्याही मेकअपची गरज उरणार नाही. पण हेच जेव्हा तुम्ही निराश, दु:खी असताना स्वत:ला आरशात पाहाता तेव्हा तुमचाच चेहरा तुम्हाला वेगळा वाटतो. मग मेकअप करूनही तो सुंदर दिसत नाही. हेच तर प्रार्थना सांगते आहे. म्हणूनच सुंदर, निरोगी राहायचं तर आनंदी, समाधानी राहा.
Web Summary : Actress Prarthana Behere reveals her beauty secret: happiness. She emphasizes that inner joy reflects on the face, making it radiant and beautiful without needing makeup. She learned this from her parents, whose happiness is the secret to their beautiful skin.
Web Summary : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ने अपनी खूबसूरती का राज खोला: खुशी। उनका कहना है कि आंतरिक आनंद चेहरे पर झलकता है, जिससे चेहरा बिना मेकअप के भी चमकदार और सुंदर दिखता है। यह उन्होंने अपने माता-पिता से सीखा, जिनकी खुशी ही उनकी खूबसूरत त्वचा का राज है।