Dark Circle : डोळ्यांखाली डार्क सर्कल होण्याची समस्या आजकाल भरपूर लोकांना होते. डार्क सर्कल होण्याची कारणे वेगवेगळी असतात. जर यावर वेळीच उपाय केले नाही तर चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. बऱ्याच महिला डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. मात्र, त्याऐवजी एका नॅचरल उपायाने डार्क सर्कल दूर करू शकता आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवू शकता. तो उपाय म्हणजे बटाट्याचा रस. बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी करू शकता. यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा कराल हे जाणून घ्या....
डार्क सर्कलची कारणे...
डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्याला थकवा आणि झोप पूर्ण न झाल्याचं कारण मानलं जातं. जास्त मेहनत केल्यावर रात्री पुरेशी झोप न घेतल्याने चेहऱ्यावर थकवा दिसतो. तसेच शरीरात आयर्नची कमतरता झाल्यावरही डार्क सर्कल होऊ शकतात. हे एनीमियाचं पहिलं लक्षण मानलं जातं. तसेच अनेकदा जास्त वेळ यूव्ही किरणांच्या संपर्कात आल्यानेही डार्क सर्कल येतात. अनेक डोळ्यात धूळ गेल्याने एलर्जी झाल्यामुळेही डार्क सर्कल येतात. इतकंच नाही तर आजच्या धावपळीच्या जीवनात शरीरात न्यूट्रिशनची कमतरता झाल्याने सुद्धा ही समस्या होते.
डार्क सर्कलसाठी बटाट्याचा रस
बटाट्याचा वापर करून डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यास मदत मिळते. बटाटे आणि काकडीचा रस समान प्रमाणात एकत्र करून डोळ्याच्या आजूबाजूला लावा. याने फायदा होईल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला फायदा दिसून येईल.
बटाट्याचा रसाचे चेहऱ्यासाठी फायदे
- बटाटे आणि अंड्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सैलपणा दूर होऊन त्वचा तरूण दिसू लागते. अर्धा बटाट्याचा रस घ्या, त्यात अंड्याचा पांढरा भाग टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
- अर्धा बटाट्याच्या रसात दोन चमचे दूध मिश्रित करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. याने चेहरा ताजातवाणा आणि तरूण दिसेल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरावा.
- बटाटाच्या रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. बटाट्यामुळे गरमीने खराब झालेल्या चेहऱ्याला आराम मिळतो आणि डाग दूर होण्यास मदत मिळते.