Lokmat Sakhi >Beauty > पिकलेले ठणकणारे मोठे पिंपल फोडल्यावर आणखी वाढतो त्रास, डाग कमी करणारा घरगुती उपाय

पिकलेले ठणकणारे मोठे पिंपल फोडल्यावर आणखी वाढतो त्रास, डाग कमी करणारा घरगुती उपाय

Popping a pimple increases the pain, home remedies to reduce pimple scars, see how to manage pimple problem : पिंपल्स फोडल्यावर आणखी वाढतात. पाहा काय करायचे. काळजी घेणे गरजेचेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2025 13:00 IST2025-08-03T12:59:26+5:302025-08-03T13:00:45+5:30

Popping a pimple increases the pain, home remedies to reduce pimple scars, see how to manage pimple problem : पिंपल्स फोडल्यावर आणखी वाढतात. पाहा काय करायचे. काळजी घेणे गरजेचेच.

Popping a pimple increases the pain, home remedies to reduce pimple scars, see how to manage pimple problem | पिकलेले ठणकणारे मोठे पिंपल फोडल्यावर आणखी वाढतो त्रास, डाग कमी करणारा घरगुती उपाय

पिकलेले ठणकणारे मोठे पिंपल फोडल्यावर आणखी वाढतो त्रास, डाग कमी करणारा घरगुती उपाय

त्वचा म्हटलं की ती कायम सुंदर आणि स्वच्छ राहू शकत नाही. चेहऱ्यावर पिंपल्स उठणे, मुरुम, डाग , ब्लॅकहेड्स  हे सारे अगदी सामान्य आहे. त्यासाठी काही उपाय करायचे नक्कीच फरक पडतो. (Popping a pimple increases the pain, home remedies to reduce pimple scars, see how to manage pimple problem )मात्र एक जरी पिंपल चेहऱ्यावर उठला तर अगदी पॅनिक होऊन मुली तो फोडून टाकतात. मुळात पिंपल फोडल्याने तो आणखी वाढतो. काही वेळा पिंपल्स लगेच जातात तर काही वेळा बरेच दिवस लागतात. मात्र त्यासाठी ते फोडण्याची काहीच गरज नाही. पिंपल्स फोडल्यावर त्याचा डाग तयार होतो. तो काळपट असा डाग जाता जात नाही.  

पिंपल्समुळे उठलेले डाग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करणे आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. पिंपल्स फोडल्यावर त्यातून निघणारा पस चेहर्‍यावर पसरला तर पिंपल्स वाढतात. चेहरा धुण्यासाठी चांगले नैसर्गिक फेसवॉश वापरावेत. त्रिफळाचूर्ण, बेसन(जर त्वचेला चालत असेल तरच), गुलाब पाणी अशा उपायांचा फरक पडतो.

मधाचा वापर खूप उपयुक्त ठरतो. मध त्वचा उजळवण्यास मदत करते. तसेच मध त्वचेला पोषण देते. कोरफडीचा वापर करावा. कोरफड चेहर्‍यासाठी एकदम चांगली असते. पिंपल्स, डाग, मुरुम सारे कमी होईल.  यामध्ये सूज कमी करणारे आणि त्वचा पुन्हा निर्माण करण्याचे गुणधर्म असतात. बटाटा आपण आवडीने खातोच, मात्र त्वचेसाठी बटाटा एकदम मस्त.  बटाट्याचा रस आणि बटाटाच्या सालीमुळे त्वचा निरोगी राहते. काकडीचा रस वापरणे हा ही एक उपाय आहे. या साऱ्या गोष्टी डाग कमी करण्यात मदत करतात.

जर डाग खूप गडद असतील, तर केमिकल पील, माइक्रोडर्माब्रेशन, लेजर ट्रीटमेंटसारख्या उपचारांचा पर्याय आता आरामात उपलब्ध आहे. त्याची माहिती डॉक्टरांकडून घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य ती ट्रिटमेंट घ्या. डाग फारच असतील तर त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणता घरगुती उपायही करु नका. महत्त्वाचं म्हणजे, पिंपल्स येऊच नयेत यासाठी आरोग्यदायी आहार घेणं, पाणी भरपूर पिणं, स्ट्रेस कमी करणं आणि पुरेशी झोप घेणं हे सगळं आवश्यक आहे.

पिंपल्स फोडणं ही त्वचेसाठी घातक सवय आहे आणि ती टाळल्यास नंतर होणारे डाग आणि ट्रीटमेंटची गरजच भासत नाही. त्यामुळे बरेच दिवस पिंपल जात नाही म्हणून फोडून टाकला असे करु नका. उपाय करत राहा, काही दिवसांनी पिंपल जाईल पण फोडल्यावर डाग जाता जाणार नाहीत. 

Web Title: Popping a pimple increases the pain, home remedies to reduce pimple scars, see how to manage pimple problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.