चेहर्यावर पिंपल्स आणि मुरुम येण्यामागे फक्त धूळ, प्रदूषण किंवा त्वचेची काळजी कमी घेणे एवढेच कारण नसते. आपल्या रोजच्या खाण्यापिण्याचाही त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. काही पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात, काही त्वचा अधिक तेलकट करतात तर काही पदार्थ वारंवार खाल्ल्याने मुरुम वाढल्याचे अनेकांना जाणवते. (Pimples on your face? these 5 foods make it even worst , try home remedies )विशेषतः उन्हाळ्यात आणि किशोरवयात या गोष्टी अधिक दिसून येतात. त्वचेवर सतत जर पिंपल्स येत असतील आणि त्यासाठी तसे काही खास कारण नसेल तर आहारामुळेही पिंपल्स येतात. काही पदार्थ आपण आवडीने खातो मात्र ते चेहऱ्यावर येणाऱ्या या फोडांना कारणीभूत ठरतात.
आंबा हा फळांचा राजा असला तरी जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास काही लोकांच्या चेहऱ्यावर उष्णतेमुळे पिंपल्स येतात. त्वचा खराब होतो. विशेषतः रोज आमरस किंवा खूप गोड आंबे खाल्ल्यास त्वचेवर परिणाम दिसू शकतो. आंबा उष्ण असतो. त्यामुळे प्रमाणातच खावा.
शेंगदाणे हे देखील काही लोकांसाठी त्रासदायक ठरतात. भाजलेले शेंगदाणे, शेंगदाणा चटणी किंवा शेंगदाण्याचे कुट जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढल्यासारखे वाटते आणि त्यामुळे मुरुम येऊ शकतात. लोणचे हे जेवणाची चव वाढवते, पण त्यातील तेल, मीठ आणि मसाले जास्त प्रमाणात शरीरावर परिणाम करू शकतात. रोज भरपूर लोणचे खाणाऱ्यांमध्ये त्वचा अधिक तेलकट दिसण्याची तक्रार आढळते.
भजी, बटाटेवडे किंवा वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यास त्वचेतील तेलकटपणा वाढतो. त्यामुळे चेहऱ्यावर छोटे पिंपल्स आणि मुरुम वाढण्याची शक्यता असते. तळणीचे पदार्थ त्वचा खराब करतात. त्यामुळे तळलेले कमीच खावे. चॉकलेट आणि जास्त क्रीमयुक्त गोड पदार्थ खाल्ल्यासही काही लोकांच्या त्वचेवर लगेच परिणाम दिसतो. विशेषतः सतत गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर चेहऱ्यावर तेलकटपणा वाढू शकतो.
आजकाल अनेक जण चिप्स, इन्स्टंट नूडल्स आणि कोल्ड ड्रिंक यांसारखे पदार्थ वारंवार खातात. यात तेल, मीठ, साखर आणि कृत्रिम घटक जास्त असतात. त्यामुळे शरीरावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी फक्त क्रीम किंवा फेसवॉश पुरेसे नसते. भरपूर पाणी पिणे, ताजी फळे-भाज्या खाणे, पुरेशी झोप घेणे आणि जंक फूड कमी करणेही खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणता पदार्थ आपल्याला त्रास देतो हे ओळखून त्याचे प्रमाण कमी ठेवणे योग्य ठरते.
Web Summary : Pimples can be caused by diet, not just pollution. Reduce intake of mangoes, peanuts, fried foods, chocolates, and junk food. Hydrate, eat fresh produce, and get enough sleep for healthy skin.
Web Summary : पिंपल्स केवल प्रदूषण से नहीं, आहार से भी हो सकते हैं। आम, मूंगफली, तले हुए खाद्य पदार्थ, चॉकलेट और जंक फूड का सेवन कम करें। स्वस्थ त्वचा के लिए हाइड्रेट करें, ताज़ी उपज खाएं और पर्याप्त नींद लें।