Join us

वाटीभर पपईचा गर करतो त्वचेच्या 'या' समस्या दूर! चेहऱ्यावरचा डलनेस होईल चटकन गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 15:31 IST

Papaya Will Bring Flawless Glow On The Face Make Face Packs With These 5 Ways : 5 Ways To Use Papaya For Glowing Skin : How To Make Papaya Mask For Soft And Glowing Skin : 5 ways to use papaya to make face mask for glowing skin : त्वचेवर हवाय इन्स्टंट ग्लो मग वाटीभर पपईचा गर करेल जादू, घरीच करता येतील असे सोपे उपाय...

नितळ, तजेलदार आणि निरोगी त्वचा सगळ्यांनाच आवडते. आपली त्वचा देखील कायम नितळ, ग्लोइंग, तजेलदार आणि निरोगी असावी अशी प्रत्येकीची (ways to use papaya to make face mask for glowing skin) ईच्छा असते. असे असले तरी आपल्याला हवी तशी आपली त्वचा कधीच नसते. प्रत्येकीला त्वचेशी संबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या कायम सतावतात. त्वचेच्या (Papaya Will Bring Flawless Glow On The Face Make Face Packs With These 5 Ways) अनेक समस्या कमी होऊन त्वचा कायम ग्लोइंग (5 Ways To Use Papaya For Glowing Skin) दिसावी यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. त्वचेसाठी घरगुती उपाय करताना आपण फेसमास्कमध्ये वेगवेगळ्या फळांच्या साली आणि त्यांचा गर देखील वापरतो. यामध्ये, त्वचेसाठी पपई फळाचा गर अतिशय फायदेशीर ठरतो(How To Make Papaya Mask For Soft And Glowing Skin).

पपई फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पपेन एन्झाइम आणि त्वचेला पोषण देणारे घटक मुबलक प्रमाणात असतात. पपईच्या गरापासून तयार केलेले फेसमास्क त्वचेवरील डेड स्किन दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात. यासाठीच, जर त्वचेवर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर आपण पपईच्या गराचे वेगवेगळ्या प्रकारचे फेसमास्क तयार करून चेहऱ्यावर लावू शकतो. पपईच्या गराचे फेसमास्क वापरुन त्वचेवर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी काय करायचं ते पाहा.     

पपईच्या गराचे घरगुती फेसमॅस्क, मिळेल त्वचेला इन्स्टंट ग्लो... 

१. पपई आणि मध :- पपई आणि मधाचा फेसपॅक त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइज करतो आणि कोरडेपणा दूर करण्यात मदत करतो. या पॅकमुळे त्वचेवरील मृत पेशी स्वच्छ होतात आणि चेहरा तजेलदार व उजळ दिसतो. यासाठी पपईचा गर चांगला मॅश करून त्यात मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

स्वयंपाकघरातच आहेत पिगमेंटेशन कमी करणारे ३ पदार्थ, त्वचा होते उजळ-स्पॉटलेस- वाचा एक्सपर्ट सल्ला...

२. पपई आणि दही :- पपई आणि दह्यापासून तयार केलेला फेसपॅक त्वचेवरील मृत पेशी दूर करतो आणि त्वचेचा नैसर्गिक उजळपणा वाढवतो. या पॅकमुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी होते, ज्यामुळे पिंपल्स व एक्नेची समस्या नियंत्रणात राहते. यासाठी पपईचा गर चांगला मॅश करून त्यात दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. हा पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

३. पपई आणि हळद:- पपई आणि हळदीपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावरील सूज आणि एक्ने कमी करण्यात मदत करतो. या पॅकमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला संरक्षण देतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते. यासाठी पपईचा गर घेऊन त्यात थोडीशी हळद मिसळा. ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

चेहऱ्याला कोण चपाती लावतं? पाहा नवीन व्हायरल ब्यूटी ट्रेंड-गव्हाच्या चपातीचा शीटमास्क...

४. पपई आणि बेसन :- पपई आणि बेसनपासून तयार केलेला फेसपॅक त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण काढून त्वचा स्वच्छ करतो. यामुळे त्वचेमधील अतिरिक्त तेलही कमी होते आणि त्वचेवरील एक्ने देखील कमी होतात. हा फेसपॅक त्वचेवरील मृत पेशी हटवून त्वचेला मऊ व मुलायम बनवतो. यासाठी पपईचा गर आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकू द्या आणि नंतर हलक्या हातांनी स्क्रब करत कोमट पाण्याने धुवा.

त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

५. पपई आणि एलोवेरा जेल :- पपई आणि एलोवेरा जेल तयार केलेला फेसपॅक त्वचेवरील सूज कमी करून त्वचेला शांत व थंडावा देतो. यामुळे सनबर्न आणि त्वचेच्या कोरडेपणाची समस्या कमी होते. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा मऊ व तजेलदार दिसते. यासाठी पपईचा गर आणि एलोवेरा जेल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीफळे