तेलकट त्वचा असणं ही काही वाईट गोष्ट नाही, पण योग्य काळजी घेतली नाही तर तीच त्वचा मुरुम, ब्लॅकहेड्स, मोठे पोर्स आणि निस्तेजपणा यांचं कारण ठरु शकते. त्वचेवर नैसर्गिक तेल (सेबम) जास्त प्रमाणात तयार झालं की चेहरा सतत चमकतो मात्र ही चमक चांगलीवाली नसून चिकटपणा असतो आणि त्यावर धूळ-मळ पटकन चिकटते. (Oily skin means pimples and blackheads on the face, 5 easy solutions for cleaning oily skin )त्यामुळे तेलकट त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात आधी दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुण्याची सवय लावा. खूप फेसवॉश वापरणे टाळा, कारण वारंवार धुतल्याने त्वचा आणखी तेल तयार करु शकते. जेल-बेस किंवा फोमिंग क्लेन्झर तेलकट त्वचेसाठी योग्य ठरतात.
मॉइश्चरायझर टाळू नका. अनेकांना वाटतं की तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते, पण हे चुकीचं आहे. ऑइल-फ्री आणि वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि अतिरिक्त तेलनिर्मिती कमी होते. आठवड्यातून एक-दोन वेळा हलकं एक्सफोलिएशन केल्याने मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. मात्र रोज स्क्रब करणे टाळा. यामुळे त्वचा सेंसिटिव्ह होऊ शकते. सन्स्क्रीन वापरणे अत्यावश्यक आहे. ऑइल-फ्री किंवा मॅट फिनिश सन्स्क्रीन निवडा. उन्हामुळे त्वचेतील तेलाचे प्रमाण आणि पिगमेंटेशन वाढू शकते. तेल वेळीच साफ केले नाही तर त्वचेचे विविध त्रास सुरु होतात. त्याचे रुपांतर नंतर त्वचेच्या विकारांमध्ये होते.
आता काय टाळावे ते पाहूया. जास्त तेलकट, तळलेले आणि जंक फूड खाणे कमी करा. सतत चेहऱ्याला हात लावणे टाळा. हे केल्याने बॅक्टेरिया त्वचेवर साठून मुरूम वाढू शकतात. जड मेकअप आणि पोर्स बंद करणारी उत्पादने वापरणेही टाळा. जर तेलकट त्वचेकडे दुर्लक्ष केले तर काय होऊ शकते? सततचा तेलकटपणा पोर्स मोठे करतो, मुरूम वारंवार येऊ लागतात, त्वचेवर डाग पडू शकतात आणि त्वचा असमान दिसू लागते म्हणजेच रंग वेगळा दिसू लागतो. वेळेवर काळजी घेतली नाही तर त्वचा निस्तेज दिसू लागते.
म्हणूनच तेलकट त्वचा असली तरी योग्य सवयी, संतुलित आहार आणि नियमित स्किनकेअर यामुळे त्वचा निरोगी, स्वच्छ आणि फ्रेश दिसू शकते. त्वचेचा प्रकार ओळखा आणि त्यानुसार काळजी घ्या, हीच सुंदर आणि तजेलदार त्वचेची गुरुकिल्ली आहे.
Web Summary : Oily skin needs care to avoid pimples, blackheads, and dullness. Wash twice daily with a mild face wash and use oil-free moisturizer. Exfoliate lightly, use sunscreen, avoid oily foods, and touching your face. Neglecting oily skin leads to large pores and blemishes. Consistent care keeps skin healthy.
Web Summary : तैलीय त्वचा को पिंपल्स, ब्लैकहेड्स और सुस्ती से बचने के लिए देखभाल की ज़रूरत होती है। दिन में दो बार हल्के फेसवॉश से धोएं और ऑयल-फ्री मॉइस्चराइजर का इस्तेमाल करें। हल्के से एक्सफोलिएट करें, सनस्क्रीन का इस्तेमाल करें, तैलीय भोजन और चेहरे को छूने से बचें। तैलीय त्वचा की उपेक्षा करने से बड़े छिद्र और धब्बे हो जाते हैं। लगातार देखभाल से त्वचा स्वस्थ रहती है।