Join us

तेलकट त्वचा म्हणजे भरपूर कोंडा, पाहा ओला कोंडा झाल्यावर काय करायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 18:13 IST

Oily skin means a lot of dandruff, see what to do when you have wet dandruff : ओला कोंडा झाल्यावर काय करायला हवे. जाणून घ्या हा चिवट कोंडा का होतो.

सध्या केस गळणे ही एक मोठी समस्या आहे. केसांसाठी काय करावे आणि काय नाही असे होते. सगळ्यांनी सांगितलेले सगळे प्रयोग केले तरी केस गळायचे काही थांबत नाहीत. हा त्रास कमी होत नाही तर केसात कोंडा व्हायला सुरवात होते. कोंडा झाला की डोक्याला सारखी खाज सुटते. कोंड्यामुळेही केस गळतात. फक्त गळत नाहीत तर केसांची मजबुती कमी होते. (Oily skin means a lot of dandruff, see what to do when you have wet dandruff)केस अगदी कमकुवत होतात. त्यामुळे तुटतात. गळतात. कोंडा कमी करण्यासाठी आधी कोंड्याचा प्रकरा समजून घेणे गरजेचे असते. कोंडा फक्त एकाच प्रकारचा नसतो. प्रत्येकाचा कोंडा वेगळा असतो. कोंडा व्हायची कारणे आणि कमी करण्याचे उपायही वेगळेच असतात.

साधा कोंडा कमी  करण्याचे अनेक उपाय आपल्याला माहिती आहेत. पांढर्‍या रंगाचा सुका कोंडा अनेकांच्या केसात असतो तो बरा करण्यासाठी अनेक औषधे मिळतात. ते उपाय तुम्ही करतच असला. पण कधी तुम्हाला ओला कोंडा होतो का? हा कोंडा केसाच्या मुळाशी चिकटून राहतो. खाज तर प्रचंड सुटतेच. मात्र खाजवल्यावर त्वचाही सोलवटली जाते एवढा घट्ट हा कोंडा डोक्याला चिकटलेला असतो. त्याला 'स्काल्प एक्झिमा' असे नाव आहे. टाळूवर असा कोंडा झाला की त्याचा परिणाम चेहर्‍यावरही होतो. हा कोंडा तेलकट त्वचा असलेल्या लोकांना जास्त होतो. कोंडा हाताला जरी ओला लागला तरी तो फक्त ओला नसून तो तेलकट असतो. हा कोंडा हिरवट रंगाचा असतो. रक्तासारखे फोड या कोंड्यामुळे टाळूवर उठतात. मालासेझिया हा एक प्रकारचा यीस्ट आहे जो टाळूवर समस्या निर्माण करतो. तेलकट त्वचा असल्यावर हा मालासेझिया टाळूवर असतोच. त्यामुळे तेलकट त्वचेला कोंड्याची समस्या सहन करावी लागते. 

 जर तुम्हाला ओला कोंडा असेल तर सगळ्यात आधी चांगला अँण्टी फंगल शाम्पू वापरायला सुरवात करायला हवी. तेल केसांसाठी फार गरजेचे असते. मात्र ज्यांची त्वचाच मुळात तेलकट आहे त्यांनी तेल लावण्याचे प्रमाण कमी ठेवायला हवे. केसांमध्ये आधीच तेल असते. वरतून आणखी तेल लावल्यामुळे कोंडा वाढू शकतो. कोणतेही तेल वापरायचे टाळा चांगले तेल डॉक्टरांच्या सल्यानेच लावा. टी ट्री ऑइल वापरणे चांगले ठरेल. टाळू तेलकट वाटतो म्हणून सारखे केस धुवायचे नाहीत. तेल पुन्हा सुटतेच. केस धुताना भरपूर पाणी वापरायचे. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणता तरी चांगलाच शाम्पू वापरा. केसाला कोरफड लावायची. 

टॅग्स :केसांची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य