Join us

चेहऱ्यावरील पुरळ, डाग गायब करण्याचा रामबाण उपाय, ७ दिवसात चेहरा होईल चमकदार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:35 IST

Skin Care : तुम्ही सुद्धा पुरळ आणि डाग घालवण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत.

Skin Care  : वाढत्या वयासोबत त्वचेच्या वेगवेगळ्या समस्याही वाढू लागतात. त्वचेवर डाग, चट्टे, पुरळ या तर फारच कॉमन समस्या आहेत. तारूण्यात येत असताना चेहऱ्या पुरळ किंवा मुरमं येणं तर आलंच. ही समस्या कॉमन असली तरी तेवढीच डोकं दुखवणारीही असते. चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरूम (Pimples) येणं कुणालाही आवडत नाही. या पूर्ण चेहऱ्या सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. अनेकदा तर पुरळ फुटण्याचे डागही चेहऱ्यावर नेहमीसाठी राहतात.

चेहऱ्यावरील पुरळ आणि हे डाग दूर करणं काही सोपं काम नाही. त्यासाठी बरंच काही करावं लागतं. जर तुम्ही सुद्धा पुरळ आणि डाग घालवण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत.

७ दिवसात खुलेल चेहरा

प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून या आयुर्वेदिक उपायाची माहिती दिली आहे. त्यांनी व्हिडिओत दावा केला आहे की, जर तुम्ही हा आयुर्वेदिक उपाय रोज दिवसांपर्यंत केला तर चेहऱ्यावरील मुरूम दूर होतील. या उपायानं पित्त शांत कऱण्यासही मदत मिळते. 

लागणारं साहित्य

३ ते ४ लवंग

मध

लिंबाचा रस

कडूलिंबाच्या पानांची पेस्ट

कसं तयार कराल?

सगळ्यात आधी तर ३ ते ४ लवंग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी या लवंग कांडून बारीक करा. त्यात थोडं मध आणि लिंबाचा रस टाका. आता या गोष्टी चांगल्या मिक्स करा. 

रोज सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हे मिश्रण खायचं आहे. जर तुम्हाला हे चेहऱ्यावर लावायचं असेल तर या मिश्रणात कडूलिंबाच्या ताज्या पानांची थोडी पेस्ट टाकून लावू शकता. यानं पुरळ दूर करण्यास मदत मिळेल.

काय मिळतात फायदे?

लवंगाचा हा उपाय करून रक्त शुद्ध होतं. वाढलेलं पित्त शांत होतं. अ‍ॅक्टिव पिंपल्स आतून साफ होतात. त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

पॅच टेस्ट कराल

हे मिश्रण पिंपल्सवर लावल्यानं तुम्हाला काही समस्या होऊ नये यासाठी आधी पॅच टेस्ट नक्की करा. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कुणाला हे सूट होईल न होईल हे सांगता येत नाही. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स