Mustard Seeds For Skin : मोहरीच्या तेलाचे फायदे तर तुम्हाला माहीत असतीलच. पण मोहरीच्या बियांनी त्वचेसाठी होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. मोहरीच्या तेलाचा आणि बियांचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पूर्वीपासून होतो. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासोबतच मोहरीच्या बिेया त्वचा आणि केसांची सुंदरता वाढवण्यातही फायदेशीर ठरतात.
सामान्यपणे मोहरीच्या बियांचा वापर पदार्थांना तडका देण्यासाठी केला जातो. पण मोहरीच्या बियांनी त्वचाही ग्लोईंग करता येते. मोहरीचं तेल त्वचा तरूण करण्यासोबतच ग्लोईंगही करते. ड्राय स्कीन असलेल्यांसाठी मोहरीच्या बिया तर रामबाण उपाय मानल्या जातात. चला जाणून घेऊ आणखी काही फायदे....
नॅचरल स्क्रब
मोहरीच्या बिया एकप्रकारे नॅचरल स्क्रबप्रमाणे काम करतात. यात तुम्ही लॅव्हेंडर आणि गुलाब असेंशिअलचे काही थेंब टाकू शकता. आता यापासून एक स्क्रब तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करून तुम्ही त्वचेवरील डेड स्कीन दूर करू शकता.
डायड्रेट त्वचा
मोहरीच्या बियांचं पावडर तयार करून त्यात अॅलोवेरा जेल घालून करून चेहऱ्यावर लावता येतं. याने चेहरा हायड्रेट राहतो. याने चेहरा स्वच्छ होतो आणि चमकदार होतो.
अॅंटी-एजिंग
मोहरीच्या बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन आढळतं. यात व्हिटामिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असतात. सर्वच पोषक तत्व एक चांगलं अॅंटी-ऑक्सिडेंट तयार करतात. त्यामुळे हे सर्वच तत्व एका अॅंटी-एजिंगप्रमाणे काम करतात. याने त्वचा तरूण दिसते.
केसांची वाढ
मोहरीच्या बियांपासून काढण्यात आलेल्या तेलात व्हिटामिन ए भरपूर असतात. व्हिटामिन ए केसांच्या विकासासाठी अधिक फायदेशीर असतं. यात केसांची वाढ वेगाने करण्याचे गुण असतात.
इन्फेक्शनपासून बचाव
मोहरीच्या बियांमध्ये सल्फर हे तत्व आढळतं. यात अॅंटी-फंगल गुण आढळतात, जे चेहऱ्यावर होणाऱ्या संक्रमणाला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
