मेकअप करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तो योग्य पद्धतीने काढणंही गरजेचं असतं. अनेक महिला दिवसभराचा थकवा झाल्यानंतर मेकअप न काढताच झोपतात किंवा फक्त पाण्याने चेहरा धुवून मोकळ्या होतात. (Not cleaning makeup properly can damage the skin, know the correct way to remove makeup, the skin will remain radiant..)पण ही सवय त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. मेकअप व्यवस्थित न काढल्यास त्वचेवरील छिद्र बंद होतात, पुरळ येऊ शकतात, त्वचा निस्तेज दिसू लागते आणि अकाली सुरकुत्यांचाही त्रास वाढू शकतो. त्यामुळे मेकअप धुताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
सर्वात आधी मेकअप काढण्यासाठी चेहरा जोरजोरात घासणे टाळा. विशेषतः डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते. काजळ, मस्कारा किंवा आयलाइनर काढताना हलक्या हाताने मेकअप रिमूव्हर वापरणं योग्य ठरतं. सतत रगडल्याने त्वचा सैल पडण्याची शक्यता वाढते. फक्त फेसवॉश वापरून मेकअप पूर्णपणे निघतोच असं नाही. विशेषतः वॉटरप्रूफ मेकअप असल्यास मेकअप रिमूव्हर, मायसेलर वॉटर किंवा खोबरेल तेलासारख्या सौम्य पर्यायांचा वापर करावा. त्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेवर मेकअप राहत नाहीत.
अनेक जणी गरम पाण्याने चेहरा धुतात, पण खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी करू शकतं. त्यामुळे कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करणं अधिक चांगलं मानलं जातं. चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने त्वचा जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने टिपून कोरडी करावी. मेकअप काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावणंही तितकंच गरजेचं आहे. मेकअप काढताना त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे त्वचेला योग्य मॉइश्चर मिळाल्यास ती मऊ आणि तजेलदार राहते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेतल्यास सकाळी चेहरा अधिक फ्रेश दिसतो.
तसंच मेकअप ब्रश, स्पंज किंवा ब्युटी ब्लेंडर नियमित स्वच्छ ठेवणंही महत्त्वाचं आहे. घाणेरड्या मेकअप साधनांमुळे त्वचेवर जंतू वाढू शकतात आणि त्यामुळे पुरळ किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सुंदर दिसण्यासाठी मेकअप मदत करतोच, पण निरोगी त्वचेसाठी योग्य स्किनकेअरही तितकीच आवश्यक असते. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी मेकअप काढूनच झोपण्याची सवय लावणं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं.
Web Summary : Proper makeup removal is crucial. Sleeping with makeup clogs pores, causing breakouts, dullness, and wrinkles. Use gentle removers, lukewarm water, and moisturize. Clean tools regularly for healthy, radiant skin.
Web Summary : मेकअप ठीक से हटाना ज़रूरी है। मेकअप के साथ सोने से रोमछिद्र बंद हो जाते हैं, जिससे मुंहासे, सुस्ती और झुर्रियाँ होती हैं। सौम्य रिमूवर, गुनगुना पानी इस्तेमाल करें और मॉइस्चराइज़ करें। स्वस्थ त्वचा के लिए नियमित रूप से उपकरणों को साफ करें।