Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहर्‍यासाठी महागड्या क्रिम्स नको - फक्त पाणी करते कमाल, विश्वास बसत नाही? जाणून घ्या पाणी वापरण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 15:51 IST

No need for expensive creams for your face - just water does the trick, don't you believe it? Learn the right way to use water : फक्त पाण्याचा वापर करुन चेहरा ठेवा सुंदर.

चेहरा सुंदर, ताजातवाना आणि स्वच्छ ठेवण्यासाठी महागडी सौंदर्य उत्पादने वापरणे आवश्यकच असते असे नाही. अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर पुरेसा असतो. पाणी आणि बर्फ हेच त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी पुरेसे ठरतात. अर्थात साबण किंवा फेसवॉश वापरावेच लागते. पण काळजी घेण्यासाठी योग्य पद्धतीने पाण्याचा वापर केल्यास त्वचा स्वच्छ, प्रसन्न आणि नैसर्गिकरित्या उजळ दिसू लागते.

चेहरा स्वच्छ ठेवण्याची सुरुवात पाण्यापासूनच होते. दिवसातून किमान दोन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे अत्यंत गरजेचे आहे. त्यावेळी साबण वगैरे काही लावायची गरज नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहरा धुतल्याने रात्रभरात साचलेला तेलकटपणा, घाण आणि मृत पेशी निघून जातात. यामुळे त्वचा श्वास घेऊ लागते आणि दिवसभरासाठी ताजेपणा टिकून राहतो. चेहरा धुताना फार गरम पाणी टाळावे. (No need for expensive creams for your face - just water does the trick, don't you believe it? Learn the right way to use water)कारण गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे चेहरा कोरडा पडतो आणि निस्तेज दिसतो.  कोमट किंवा साधे थंड पाणी चेहर्‍यासाठी अधिक योग्य ठरते. गरम पाणी वापरणे टाळाच. 

चेहरा धुताना पाणी जोरात उडवण्याऐवजी हलक्या हाताने चेहर्‍यावर शिंपडावे आणि बोटांच्या टोकांनी सौम्यपणे फिरवावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर ताण येत नाही. चेहरा पुसताना टॉवेलने जोरात घासू नये, हलक्या हाताने टिपत पुसल्यास त्वचा निरोगी राहते. तसेच पाणी थोडा वेळ चेहर्‍यावर तसेच ठेवणेही फायद्याचे ठरते. 

बर्फाचाही चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी उपयोग होतो. बर्फामुळे त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे चेहर्‍यावरील सूज, थकवा आणि डोळ्यांखालची सूज कमी होण्यास मदत होते. सकाळी किंवा थकवा जाणवत असताना स्वच्छ कपड्यात गुंडाळलेला बर्फ काही सेकंद चेहर्‍यावर हलक्या हाताने फिरवावा. थेट बर्फ जास्त वेळ त्वचेवर ठेवणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

नियमित पाणी पिणे हेदेखील चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. शरीराला पुरेसे पाणी मिळाले तर त्वचा आतून हायड्रेट राहते, कोरडेपणा कमी होतो आणि चेहर्‍यावर नैसर्गिक तेज येते. बाहेरुन पाण्याचा योग्य वापर आणि आतून पाणी पिण्याची सवय या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Water is enough, no expensive creams needed for beautiful face.

Web Summary : Water and ice are enough for skincare. Wash face twice daily with plain water. Use gentle movements. Ice reduces puffiness. Drink enough water to hydrate skin naturally.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्सहोम रेमेडी