Dark Elbows Remedy: हाताचे कोपरं काळे होण्याची समस्या अनेकांना होते. अनेकदा तर कितीही चांगली तयारी केली, कितीही चांगले कपडे घातले तरी कोपराच्या काळपटपणामुळे सगळं वाया जातं. अनेकदा तर ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि ब्लीचचा देखील वापर केला जातो, पण काही फायदा मिळत नाही. हेही तितकंच खरं आहे की, कोपराचा काळपटपणा दिसायलाही चांगला वाटत नाही. पण कोपरांचा हा चिव्वट काळपटपणा दूर करण्यासाठी काही नॅचरल उपाय करू शकता.
कोपरेच काय तर गुडघ्यांचा काळपटपणा सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. महत्वाची बाब म्हणजे यात कोणतंही केमिकल नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला टूथपेस्ट, सोडा पावडर, टोमॅटो, कॉफी पावडर आणि लिंबाच्या रसाची गरज भासेल.
कशी बनवाल पेस्ट?
हा उपाय करण्यासाठी आधी थोडी टूथपेस्ट घ्या. त्यात सोडा मिक्स करा. नंतर या पेस्टमध्ये कॉफी पावडर घाला. त्यानंतर टोमॅटो कुस्करून त्याचा रस काढा आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करा. कोपराचा काळपटपणा दूर करणारा रामबाण उपाय तयार आहे.
कसा कराल वापर?
हा उपाय वापरण्यासाठी कोपरावर, गुडघ्यांवर आणि मानेवर जिथे काळपटपणा आहे तिथे पेस्ट हलक्या हातानं लावा. १० ते १५ मिनिटं ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर थंड पाण्यानं हलक्या हातानं घासत पेस्ट धुवून टाका. हा उपाय तीन दिवस लागोपाठ करायचा आहे. तीन दिवासांनी आपल्याला फरक दिसायला लागेल.
त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. कारण यातील सोडा आणि लिंबू दोन्हींमध्ये ब्लीचिंग तत्व असतात, जे डेड स्किन सेल्स दूर करून त्वचेची रंगत वाढवतात. तसेच कॉफी आणि टोमॅटो या गोष्टी स्क्रबसारख्या काम करतात. ज्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. तसेच टूथपेस्टनं काळपटपणा दूर होतो.