Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > मेकअप करुन दिसता सुंदर पण भयानक बॅक्टेरियांचं चेहऱ्यावर होतंय इन्फेक्शन! चेहरा कायमचा होईल विद्रूप कारण..

मेकअप करुन दिसता सुंदर पण भयानक बॅक्टेरियांचं चेहऱ्यावर होतंय इन्फेक्शन! चेहरा कायमचा होईल विद्रूप कारण..

Never make these mistakes while applying makeup, your face will become dull : मेकअप करताना अजिबात करु नका या चुका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2025 15:40 IST2025-11-04T15:28:33+5:302025-11-04T15:40:25+5:30

Never make these mistakes while applying makeup, your face will become dull : मेकअप करताना अजिबात करु नका या चुका.

Never make these mistakes while applying makeup, your face will become dull | मेकअप करुन दिसता सुंदर पण भयानक बॅक्टेरियांचं चेहऱ्यावर होतंय इन्फेक्शन! चेहरा कायमचा होईल विद्रूप कारण..

मेकअप करुन दिसता सुंदर पण भयानक बॅक्टेरियांचं चेहऱ्यावर होतंय इन्फेक्शन! चेहरा कायमचा होईल विद्रूप कारण..

आजच्या काळात मेकअप एक महत्त्वाचा घटक झाला आहे. पण सुंदर दिसण्याच्या घाईत काही लहान चुका अनेकदा मोठा फरक घडवतात. (Never make these mistakes while applying makeup, your face will become dull forever)या चुका केवळ लूक बिघडवत नाहीत, तर त्वचेलाही हानी पोहोचवतात. म्हणूनच मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

अनेक महिला घाईगडबडीत चेहरा न धुता थेट मेकअप लावतात. पण चेहऱ्यावर धूळ, तेल किंवा घाम राहिल्यास मेकअप नीट बसत नाही आणि त्वचा   खराब होते. यामुळे पिंपल्स किंवा त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता वाढते. म्हणून मेकअप करण्यापूर्वी चेहरा क्लेंझरने स्वच्छ धुऊन हलका मॉइश्चरायझर लावणं अत्यंत गरजेचं आहे.

दुसरी मोठी चूक म्हणजे चुकीचा फाउंडेशन शेड निवडणे. काही जणी फेअर दिसण्यासाठी खूप उजळ फाउंडेशन वापरतात, पण त्यामुळे चेहरा आणि मान यांचा रंग वेगळा दिसतो. हे अत्यंत अनैसर्गिक वाटतं. आपल्या त्वचेच्या टोनशी जुळणारा, नैसर्गिक फिनिश देणारा फाउंडेशन शेड निवडणं हेच योग्य आहे.

अनेकदा आपण समजतो की जास्त मेकअप लावल्याने आपण अधिक सुंदर दिसू. पण प्रत्यक्षात जास्त प्रमाणात फाउंडेशन, ब्लश किंवा हायलाइटर वापरल्याने चेहरा जाड आणि कृत्रिम दिसतो. नैसर्गिक लूकसाठी हलका आणि सॉफ्ट मेकअप नेहमीच उठून दिसतो.

मेकअपमध्ये वापरले जाणारे ब्रशेस आणि स्पॉन्जेस हे स्वच्छ ठेवणं आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. हे अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. वापरानंतर न साफ केलेले ब्रशेसमध्ये बॅक्टेरिया वाढतो. परिणामी त्वचेवर अॅलर्जी, खाज, पिंपल्स यांसारखे त्रास होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ब्रशेस कोमट पाणी आणि सौम्य साबणाने स्वच्छ धुणं आवश्यक आहे.

सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री मेकअप न काढता झोपणं. दिवसभर त्वचेवर लावलेले प्रॉडक्ट्स, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहर्‍यावरील रोमछिद्रं बंद होतात. झोपताना मेकअप न काढल्यास त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि ती निस्तेज दिसू लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हर, नारळ तेल किंवा अ‍ॅलोव्हेरा जेलने चेहरा स्वच्छ पुसून नंतर हलका मॉइश्चरायझर लावा.

Web Title : मेकअप करते समय इन गलतियों से बचें, चेहरा हो जाएगा बेजान।

Web Summary : बिना साफ किए मेकअप लगाने, गलत फाउंडेशन इस्तेमाल करने और ज्यादा प्रोडक्ट लगाने से बचें। हर हफ्ते ब्रश साफ करें और सोने से पहले मेकअप जरूर हटाएं, वरना त्वचा बेजान हो जाएगी।

Web Title : Avoid these makeup mistakes, or your face will become dull.

Web Summary : Avoid applying makeup without cleansing, using the wrong foundation, or excessive product. Clean brushes weekly and always remove makeup before sleeping to prevent dull skin and breakouts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.