नवरात्रीत घटस्थापना करताना कडधान्यांचे रुजवण केले जाते. या घटात धान्य किंवा कडधान्ये पेरली जातात, ज्यांना आपण 'रुजवण' म्हणतो. ही रुजलेली, हिरवीगार झालेली इवलीशी रोपं सुंदर दिसतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत वाढलेले हे रुजवणं, नवरात्र संपल्यावर याच नेमकं करायचं काय? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. घटात वाढलेलं रुजवणं काहीजणी केसात माळतात, तर काहीजणी आपल्या गार्डनमध्ये छोटाशा कुंडीत हे रुजवणं (Navratri ghaatasthapana sprouts for skin & hair care) पुन्हा पेरतात. परंतु याशिवायही आपण या रुजवणाचा वापर केस व त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी करु शकतो. खरंतर, या अंकुरलेल्या कडधान्यांमध्ये त्वचा व केसांसाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्याचा वापर करून नैसर्गिक फेस आणि हेअरपॅक (beauty benefits of Navratri ghaat sprouts) तयार करता येतो, ज्यामुळे चेहऱ्याला तजेलदारपणा, पोषण आणि नैसर्गिक उजळपणा मिळतो. याचबरोबर, केसांच्या अनेक समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते.
सण संपल्यावर उरलेली घटातील रुजवण अनेकदा वाया जाते. पण याचाच जर घरच्याघरीच केस आणि त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणून फेस, हेअरपॅक तयार करण्यासाठी म्हणून वापर केला, तर त्वचेला केमिकलशिवाय सुंदर तेजस्वी लुक मिळू शकतो. या रुजवणीत असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेचे पोषण करून तिला आतून हेल्दी ठेवतात. एवढंच नव्हे, तर केसांचे हरवलेले नैसर्गिक सौंदर्य पुन्हा मिळवण्यास मदत होते. नवरात्रीत घटातील अंकुरलेली छोटी रोपं आपल्या सौंदर्यासाठी अमृतासारखी उपयोगी ठरतात. या अंकुरलेल्या रोपांचा त्वचा व केसांसाठी नेमका वापर कसा करायचा ते पाहूयात.
नवरात्रीतील रुजवणं, त्वचा व केसांसाठी आहे अमृत...
१. त्वचेसाठी फेसपॅक कसा करायचा ?
१. रुजवणं वाटून त्याची पेस्ट तयार करुन घ्या, मग यात दही घाला. फेसपॅक तयार आहे. त्वचेवरचा थकवा, टॅन व डलनेस कमी होतो.
२. रुजवणं वाटून त्याची पेस्ट तयार करा, मग यात मध आणि गुलाबपाणी घालून फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक ड्राय स्किनला हायड्रेशन व ग्लो मिळतो.
३. रुजवणाच्या पेस्टमध्ये हळद, बेसन घालून देखील फेसपॅक तयार करु शकता. याच्या वापरामुळे डाग, पिग्मेंटेशन व स्किन टोन सुधारतो.
अप्पर लिप्सचे केस वाढले? करा बेसनाचा झक्कास उपाय - वेदना न होता केस निघतील सहज...
२. केसांसाठी हेअरपॅक कसा तयार करायचा ?
१. रुजवणं मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यांची पेस्ट तयार करून घ्यावी. मग या पेस्टमध्ये थोडे नारळाचे तेल मिसळून केसांवर लावावे. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसगळती कमी होते.
२. रुजवणं पेस्टमध्ये थोडे कोरफड जेल मिसळून घ्यावे आणि केसांसाठी हेअरपॅक तयार आहे. खास या हेअरपॅकमुळे स्काल्पला थंडावा मिळतो आणि डॅन्ड्रफ कमी होतो.
३. रुजवणाच्या बारीक पेस्टमध्ये थोडीशी मेथी पावडर मिसळून केसांसाठी हेअरपॅक तयार करून घ्यावा. यामुळे केसांना मऊसरपणा व शाईन येते.
वापरण्यापूर्वी लक्षात ठेवा...
१. रुजवणं वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन, थोडं पाणी घालून बारीक करून वापरावी.
२. आठवड्यातून फक्त एक वेळ वापर करणे पुरेसे आहे.
३. ॲलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट नक्की करावी आणि मगच याचा वापर करावा.