Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कोणत्या व्हिटामिनने गाल भरलेले, टवटवीत दिसतात? पाहा नेमका कोणत्या गोष्टींचा असतो यात हात

कोणत्या व्हिटामिनने गाल भरलेले, टवटवीत दिसतात? पाहा नेमका कोणत्या गोष्टींचा असतो यात हात

Which Vitamin Helps Cheeks Look Fuller : अनेकांना प्रश्न पडतो की, कोणतं व्हिटामिन खाल्ल्यावर गाल भरतात? चेहऱ्यात तजेलपणा कशाने येतो? काही लोकांचे गाल नैसर्गिकरीत्या टोमॅटोसारखे भरलेले का दिसतात? हेच आज आपण समजून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:34 IST2025-12-11T17:31:53+5:302025-12-11T17:34:08+5:30

Which Vitamin Helps Cheeks Look Fuller : अनेकांना प्रश्न पडतो की, कोणतं व्हिटामिन खाल्ल्यावर गाल भरतात? चेहऱ्यात तजेलपणा कशाने येतो? काही लोकांचे गाल नैसर्गिकरीत्या टोमॅटोसारखे भरलेले का दिसतात? हेच आज आपण समजून घेणार आहोत.

Natural ways to get chubby cheeks and fuller face | कोणत्या व्हिटामिनने गाल भरलेले, टवटवीत दिसतात? पाहा नेमका कोणत्या गोष्टींचा असतो यात हात

कोणत्या व्हिटामिनने गाल भरलेले, टवटवीत दिसतात? पाहा नेमका कोणत्या गोष्टींचा असतो यात हात

Which Vitamin Helps Cheeks Look Fuller : चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला ठसा असतो. कुणी चेहऱ्याचा तेज पाहून आकर्षित होतो, कुणी स्माइलवर फिदा होतं, तर कुणाला चेहऱ्याची हलकी गोलाकार आवडतो. पण अनेकांना अशी समस्या असते की शरीर अगदी योग्य दिसतं, पण चेहरा मात्र थोडा बारीक, सपाट किंवा थकलेला वाटतो. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, कोणतं व्हिटामिन खाल्ल्यावर गाल भरतात? चेहऱ्यात तजेलपणा कशाने येतो? काही लोकांचे गाल नैसर्गिकरीत्या टोमॅटोसारखे भरलेले का दिसतात?

खरी गोष्ट अशी की चेहर्‍याची गोलाई किंवा प्लंपनेस हा फक्त चरबीमुळे येत नाही, तर पोषण, पुरेसे पाणी, त्वचेची मजबुती आणि दैनंदिन सवयी देखील त्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात. योग्य पद्धती अवलंबून प्रत्येक जण आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक, सुंदर प्लंपनेस आणू शकतो.

गाल फुलण्यासाठी कोणतं व्हिटामिन खावा?

गाल भरलेले दिसण्यासाठी एखादा एकच व्हिटामिन कारणीभूत नसतं. अनेक पोषक घटक एकत्र काम करून चेहऱ्याला हलकी गोलाई आणि मऊपणा देतात.

व्हिटामिन B-कॉम्प्लेक्स

चेहऱ्याच्या स्नायूंना मजबूत ठेवते, त्यामुळे फेस स्ट्रक्चर उठून दिसते.

व्हिटॅमिन C

कोलेजन वाढवतं. यामुळे त्वचा स्पॉंजी, टवटवीत आणि सॉफ्ट दिसू लागते.

व्हिटामिन E

स्किनचा ओलाना लॉक करतं आणि चेहऱ्यावर हेल्दी, मॉइश्चर-फुल वॉल्यूम आणते. हे तीनही व्हिटामिन्स मिळून जेव्हा काम करतात, तेव्हा चेहऱ्याची फुलनेस नैसर्गिकरीत्या वाढू लागते.

गाल भरलेले दिसण्यासाठी काय खावे?

गालात सॉफ्टनेस व गोलाकार आणायचा असेल, तर आपल्या आहारात हेल्दी फॅट्स आणि ऊर्जा देणारे पदार्थ नक्की जोडा. अॅवोकाडो, बदाम, काजू, दही, दूध, पनीर, तूप, पीनट बटर, केळी , ओट्स, रताळे, स्मूदीज या गोष्टींचा आहारात समावेश करा. 

चेहरा नैसर्गिकरीत्या फुललेला कसा दिसेल?

फक्त आहार पुरेसा नसतो. काही लाइफस्टाईलसंबंधी सवयी चेहऱ्याची फुललेला ठेवण्यास मदत करतात.

पुरेसे पाणी प्या — त्वचा हायड्रेटेड राहते, जाडी आणि इलास्टिसिटी टिकून राहते.

फेस योगा — चीक लिफ्ट, स्माईल होल्डिंग यासारख्या एक्सरसाइजने चेहऱ्याचे स्नायू ऍक्टिव्ह राहतात आणि फुलनेस वाढतो.

गाढ झोप — स्किन रिपेअर होते आणि सकाळी चेहरा ताजा व प्लंप दिसतो.

कमी ताण — स्ट्रेसमुळे चेहऱ्याची फॅट लेयर कमी होते व चेहरा बारीक दिसू लागतो.

नैसर्गिकरीत्या गाल का जास्त भरलेले दिसतात?

काही लोकांचे गाल नैसर्गिकरीत्या फुललेले, स्पॉंजी आणि गोंडस दिसतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. जेनेटिक्स, स्किन इलास्टिसिटी, हॉर्मोनल बॅलन्स, वय इत्यादी.

Web Title: Natural ways to get chubby cheeks and fuller face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.