Join us

ड्रायनेस घालवून ओठ मुलायम करेल 'हा' सोपा नॅचरल उपाय, रंगही उजळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:43 IST

Soft Lips Tips : हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात. पण त्यांमध्ये केमिकल असल्याने त्यांचा जास्त वापर नुकसानकारक ठरू शकतो.

Soft Lips Tips : ओठ चेहऱ्याच्या सुंदरतेत महत्वाची भूमिका बजावतात. ओठ फारच संवेदनशील असल्याने हिवळ्यात थंडीमुळे ओठांची जास्त काळजी घ्यावी लागते. काळजी घेतली नाही तर ओठ ड्राय होतात आणि फाटतात. हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात. पण त्यांमध्ये केमिकल असल्याने त्यांचा जास्त वापर नुकसानकारक ठरू शकतो. अशात ओठ मुलायम ठेवण्यासाठी एका नॅचरल आणि हेल्दी पदार्थाचा वापर करू शकता. तो पदार्थ म्हणजे मध.

जर हिवाळ्यात तुमचे ओठ लवकर ड्राय होत असतील तर यासाठी ओठांवर मध लावू शकता. रात्री झोपताना ओठांवर थोडं मध लावा. मधात मॉइश्चरायजिंग गुण असल्याने ओठांमधील ओलावा जास्त वेळ कायम राहतो.

नचरल स्क्रब आहे मध

ओठांवर डेड स्किन जमा झाल्याने ते अधिक रखरखीत वाटतात. तशी तर डेड स्किन आपोआप निघते, पण या प्रोसेस दरम्यान ओठांचं सौंदर्य खराब होतं. अशात मध एका नॅचरल स्क्रबसारखं काम करतं. यात एक एंझाइम असतं जे डेड स्किन सहजपणे दूर करतं.

ओठांचा रंग उजळतो

अनेकदा योग्य ती काळजी न घेतल्यामुळं आणि स्मोकिंग केल्यानं ओठांचा नॅचरल रंग बदलू लागतो. अशात ओठांचा नॅचरल रंग कायम ठेवण्यासाठी मध फार फायदेशीर ठरतं. मधाने ओठांच्या त्वचेला आतपर्यंत पोषण मिळतं.

कसा कराल वापर?

ओठांवर लावण्यासाठी ऑर्गेनिक मध घ्या आणि त्यात काहीही मिक्स न करता थेट ओठांवर लावा. २ ते ३ मिनिटं ओठांवर मधाने मसाज करा. नंतर एका ओल्या कापडाने ओठ पुसून घ्या. अधिक चांगल्या रिझल्टसाठी हा उपाय रोज १ ते २ वेळा करू शकता.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स