Lokmat Sakhi >Beauty > काळ्या डागांमुळे दिसतो चेहरा विद्रूप, ‘हा’ नॅचरल उपाय करा; डाग गायब-चेहऱ्यावर येतं तेज

काळ्या डागांमुळे दिसतो चेहरा विद्रूप, ‘हा’ नॅचरल उपाय करा; डाग गायब-चेहऱ्यावर येतं तेज

Pigmentation : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी महागडे प्रॉडक्स वापरण्याऐवजी एक नॅचरल फेसपॅकही वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:38 IST2025-08-12T12:26:35+5:302025-08-12T14:38:58+5:30

Pigmentation : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी महागडे प्रॉडक्स वापरण्याऐवजी एक नॅचरल फेसपॅकही वापरू शकता.

Natural face pack to get rid of pigmentation | काळ्या डागांमुळे दिसतो चेहरा विद्रूप, ‘हा’ नॅचरल उपाय करा; डाग गायब-चेहऱ्यावर येतं तेज

काळ्या डागांमुळे दिसतो चेहरा विद्रूप, ‘हा’ नॅचरल उपाय करा; डाग गायब-चेहऱ्यावर येतं तेज

Pigmentation : बऱ्याचदा पुरळ येऊन गेल्यानंतर आपल्या त्वचेवर काळे डाग दिसतात. यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात. जेव्हा त्वचेच्या पेशी मेलेनिनचे जास्त उत्पादन करतात तेव्हा हायपरपिग्मेंटेशन होते. मग ही समस्या दूर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण यात भरपूर पैसे खर्च करण्याऐवजी घरीच एक फेसपॅक करून लावू शकता. ज्याच्या मदतीनं पिग्मेंटेशन म्हणजेच चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकता.

कसा बनवाल फेसपॅक?

चेहऱ्यावरील डाग दूर करणारा हा नॅचरल फेसपॅक तयार करण्यासाठी २ चमचे पपईचा गर, एक चमचा मध आणि २ चमचे दूध लागेल. सगळ्यात आधी एका वाटीमध्ये या तिन्ही गोष्टी काढून चांगल्या मिक्स करा. 

त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर सगळीकडे चांगल्या पद्धतीनं लावा. साधारण १५ मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच लावून ठेवा. नंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवून घ्या. अधिक फायद्यासाठी हा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता. 

पपईमध्ये त्वचेवरील काळे डाग दूर करणारे तत्व असतात. तसेच मध आणि दुधानं त्वचेवरील डाग दूर होतात आणि त्वचेवर ग्लो सुद्धा येतो. चेहरा फ्रेश दिसतो, त्वचा टाइट होते. तसेच त्वचा आतून साफ होते. पण हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.

Web Title: Natural face pack to get rid of pigmentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.