Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागडे प्रॉडक्ट्स विसरा, उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी 'हे' नॅचरल उपाय ठरतील बेस्ट; घामाचा त्रासही होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:22 IST

Oily Skin Care In Summer : खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. मग अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. पण अनेकदा या उपायांचे फायदे कमी आणि तोटेच अधिक होतात.

Oily Skin Care In Summer : उन्हाळा सुरू झाला रे झाला की, उन्हामुळे त्वचा काळवंडणे, कोरडी होणे अशा कितीतरी समस्या होतात. खासकरून तेलकट त्वचा असलेल्यांसाठी तर उन्हाळा फारच त्रासदायक ठरतो. त्यात घामाच्या धाराही वैताग देतात. त्यामुळे खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. मग अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. पण अनेकदा या उपायांचे फायदे कमी आणि तोटेच अधिक होतात. अशात आम्ही आपल्यासाठी काही खास आणि सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने आपल्याला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणे सोपे जाईल. 

कोमट पाण्याने चेहरा धुवा

तेलकट त्वचा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी अधिक चांगलं मानलं जातं. कारण या पाण्याने धूळ, माती, त्वचेवरील अतिरिक्त तेल चांगल्याप्रकारे निघून जातं. ज्यामुळे त्वचा क्लीन आणि मुलायम होते. चेहरा धुण्यासाठी पाणी फार जास्त गरम वापरू नये, याची काळजी घ्या.

पुन्हा पुन्हा चेहरा धुवू नका

बऱ्याच लोकांना दिवसातून अनेकदा चेहरा धुण्याची सवय असते. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा धुणंही पुरेसं आहे. दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नका. असं केल्यानं त्वचा रफ होते आणि ती ठिक करण्यासाठी तुमचे ग्लँड्स आणखी जास्त आईल रिलीज करतात. 

कमी मेकअप

उन्हाळ्यात जितकं हलकं मेकअप करू शकाल तितकं चागलं. हेवी फाउंडेशन लावणे टाळा आणि मॉइश्चरायजरचा सुद्धा वापर कमी करावा. जास्त मेकअप कराल तर घामामुळे त्वचेवर जळजळ, खाज अशा समस्या होऊ शकतात.

बेसन - मधाचा फेसपॅक

उन्हाळ्यात चेहरा टवटवीत आणि तजेलदार राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून १० मिनिटाने धुवा. त्याने त्वचा सुंदर व ताजी बनेल.

बनाना - हनी फेसपॅक 

उन्हाळ्यात त्वचेसाठी केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याऐवजी काही नॅचरल उपायही करू शकता. केळी आणि मधाचा फेसपॅक ट्राय करू शकता. यासाठी एक केळी आणि एक चमचा मध घ्या. याची चांगली मुलायम पेस्ट तयार करा. त्यात थोडा लिंबाचा रस मिश्रित करा. त्यानंतर हा फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. 

अ‍ॅपल हनी फेसपॅक

अ‍ॅपल हनी फेसपॅक हा ऑयली स्कीनसाठी परफेक्ट फेस मास्क आहे. मधामुळे स्कीनला सॉफ्ट टेक्स्चर मिळण्यास मदत होते. तर सफरचंदामुळे स्कीनला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. 

बर्फ लावा 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेवर भरपूर खाज येते. यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा खाज येणाऱ्या जागेवर फिरवा. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळुन पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर फिरवा. खाज कमी होण्यास मदत मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Natural remedies for oily skin in summer: Try these!

Web Summary : Beat oily skin this summer with simple remedies. Wash with lukewarm water, avoid over-washing, and use light makeup. Try besan-honey, banana-honey, or apple-honey face packs. Applying ice can also relieve itching.
टॅग्स :त्वचेची काळजीसमर स्पेशल