आपल्याला प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असं वाटतं असतं. परंतु, चेहऱ्यावर सतत पिंपल्स, मुरुमे येणं, डाग, ऐन तारुण्यात चेहऱ्यावर डार्क सर्कल किंवा सुरकुत्या येतात.(skin tips monsoon) चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण महागडे उत्पादने, फेश वॉशचा वापर करतो.(Monsoon beauty routine) परंतु, यामुळे चेहरा चांगला दिसण्याऐवजी तो निस्तेज- म्हातारा दिसू लागतो.(Youthful skin secrets)
आपल्या दैनंदिन सवयींचा थेट आपल्या त्वचेवर परिणाम होतो.(Anti-aging habits) चेहऱ्यावर नैसर्गिक तेज टिकवून ठेवण्यासाठी आपण काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे.(Glowing skin tips monsoon) आपली त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकदार दिसावी असं प्रत्येकाला वाटतं.(Monsoon beauty routine) वाढते प्रदूषण, खराब जीवनशैली आणि ताणतणावामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते.(Skincare mistakes to avoid) आपल्या देखील त्वचेचे नुकसान होत असेल तर जीवनशैलीतील काही चुका आपण टाळायला हव्या. आपल्या रोजच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा खराब होते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर (Natural anti-aging tips)
1. हायड्रेट न राहणे
आपण दिवसभरात कमी पाणी पितो. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. अशावेळी त्वचा कोरडी किंवा ओढल्यासारखी दिसू लागते. यासाठी आपण दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होऊन चेहरा सुधारण्यास मदत होईल.
2. योग्य आहार
हल्ली जंकफूडचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. यात तेलकट, मसालेदार पदार्थ अधिक असतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. यासाठी आपण आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या, फळे, काजू आणि बिया खायला हवेत. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात.
3. पुरेशी झोप घ्या
दिवसभर कामाचा व्याप आणि त्यात सतत चहा-कॉफीच्या सेवनाने आपल्याला रात्र झोप येत नाही. सतत स्क्रिनचा वापर वाढल्याने देखील झोप पुरेशी होत नाही. त्वचेला दुरुस्त होण्यास वेळ मिळण्यासाठी आपण किमान ७ ते ८ तासांची झोप घ्यायला हवी. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.
केस तुटून पातळ झाले-सारखं गळतात? लाल फळ ठरेल केसांसाठी फायदेशीर, होतील घनदाट-लांब
4. सनस्क्रीन वापरा
डॉक्टरांच्या मते सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळी, कोरडी आणि वृद्ध होते. त्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपण २० मिनिटाआधी सनस्क्रीन लावायला हवी. ज्यामुळे त्वचेच संरक्षण होईल.
5. ताण कमी करा
आपण अधिक प्रमाणात ताण घेतल्यास त्याचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. आपण नियमितपणे ध्यान, योगासने आणि हलका व्यायाम करा. यामुळे ताण कमी होईल आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.