Join us

चेहऱ्यावर काळे डाग? बेसनाचा 'असा' करा वापर, चेहरा दिसेल सतेज आणि डागही जातील कायमचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:39 IST

Skin Care : बेसनामध्ये जर काही गोष्टी घालून लावल्या तर चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत मिळू शकते.

How to Use Besan on Face:  वेगवेगळ्या कारणांनी चेहऱ्यावर काळे डाग, चट्टे येणं एक कॉमन समस्या आहे. हार्मोन्समध्ये बदल, औषधांचं सेवन आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात जास्त येणं या कारणांमुळे चेहऱ्यावर काळे डाग येऊ शकतात. इतकंच नाही तर पिंपल्समुळेही चेहऱ्यावर काळे डाग येतात. ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. मात्र, काही घरगुती उपायही करूनही ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी सगळ्यात प्रभावी ठरतं ते बेसन. पण फायदे मिळण्यासाठी बेसनाचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. तो कसा करावा ते पाहुयात.

बेसन आणि कोरफड

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसन आणि कोरफडीच्या गराचं कॉम्बिनेशन खूप फायदेशीर मानलं जातं. यासाठी २ चमचे बेसन घ्या आणि त्यात कोरफडीचा गर मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास तशीच ठेवा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवून घ्या. कोरफडीच्या गरानं त्वचा मुलायम, चमकदार होते. तर बेसनानं त्वचेचा रंग उजळतो. तसेच काळे डागही दूर होऊ शकतात.

बेसन आणि लिंबाचा रस

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपण बेसन आणि लिंबाच्या रसाचं मिश्रणही वापरू शकता. अर्धा चमचा बेसनात लिंबाचा रस टका. यात थोडं गुलाबजलही टाकू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. लिंबामधील सायट्रिक अ‍ॅसिडनं डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळते. 

बेसन आणि बटाट्याचा रस

बेसन आणि बटाट्याच्या रसाचं मिश्रण सुद्धा चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतं. बटाट्यामध्य ब्लीचिंग एजंट असतात, जे डाग, चट्टे आणि पिग्मेंटेशन दूर करण्यास मदत करतात. जर आठवड्यातून २ ते ३ वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावाल तर काळे डाग दूर करण्यास मदत मिळू शकते. तसेच बेसन आणि बटाट्याचा रस त्वचेची रंगतही वाढवतो.

बेसन आणि कच्चं दूध

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसन आणि कच्चं दूध देखील प्रभावी ठरतं. यासाठी २ चमचे बेसन घ्या त्यात कच्चं दूध मिक्स करा. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० ते २५ मिनिटांसाठी तशीच ठेवा. नंतर चेहरा पाण्यानं धुवा. कच्च्या दुधानं त्वचा क्लीन होते. सोबतच काळे डागही दूर होण्यास मदत मिळते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स