Join us
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या दुधात ५ गोष्टी कालवून चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो-पार्लर नको नी खर्च नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:50 IST

Raw milk on Face : नुसतं कच्चं दूध त्वचेवर लावून जास्त फायदा मिळत नाही. अधिक फायद्यासाठी कच्च्या दुधात काही गोष्टी घालाव्या लागतात. त्याच आज आपण पाहणार आहोत.

Raw milk on Face :  त्वचेसाठी कच्चं दूध खूप फायदेशीर मानलं जातं. हा एक नॅचरल स्किन केअर उपाय मानला जातो. यात लॅक्टिव अ‍ॅसिड, व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शिअम यांसारखे पोषक तत्व असतात. जे त्वचेची आतापर्यंत सफाई करतात. त्वचेला ओलावा देतात. कच्च्या दुधानं त्वचेवरील मृत पेशी दूर होतात, रंग उजळतो, सुरकुत्या कमी होतात, त्वचा मुलायम होते असे वेगवेगळे फायदे मिळतात. पण यासाठी नुसतं कच्चं दूध त्वचेवर लावून जास्त फायदा मिळत नाही. अधिक फायद्यासाठी कच्च्या दुधात काही गोष्टी घालाव्या लागतात. त्याच आज आपण पाहणार आहोत.

कच्चं दूध आणि बेसन

कच्च्या दुधात १ चमचा बेसन घालून एक सोपा फेसपॅक तयार करा. या फेसपॅकनं त्वचा आतपर्यंत साफ होते आणि मृत पेशीही दूर होतात. सोबतच टॅनिंग कमी होतं आणि त्वचा मुलायम, साफ व फ्रेश दिसते. 

कच्चं दूध आणि हळद

चिमुटभर हळद दुधात मिक्स करून त्वचेवर लावल्यास त्वचेला अ‍ॅंटी-सेप्टिक गुण मिळतात. हळद आणि दुधाच्या या मिश्रणानं चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग दूर होतात. तसेच त्वचेचा रंग खुलतो. नियमितपणे हा उपाय केला तर चेहरा साफ, चमकदार दिसेल.

कच्चं दूध आणि मध 

कच्चं दूध आणि मधाचं कॉम्बिनेश त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करतं. ड्राय, निर्जीव त्वचेला ओलावा मिळतो. तसेच या मिश्रणानं त्वचा मुलायम आणि उजळ दिसते. हा एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.

कच्चं दूध आणि गुलाबजल

गुलाबजल आणि कच्चं दूध मिक्स करून लावल्यास त्वचेची पीएच लेव्हल बॅलन्स राहते आणि त्वचा ताजीतवाणी दिसते. या मिश्रणाने चेहऱ्यावरील थकवा आणि सुस्ती दूर होते. हा उपाय कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर काम करतो. 

कच्चं दूध आणि कोरफडीचा गर

कच्च्या दुधात कोरफडीचा गर घातल्यास त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो. या मिश्रणानं जळजळ, रॅशेज आणि लालसरपणा कमी होतो. कोरफडीच्या गरानं त्वचा मुलायम होते. तसेच त्वचेला पोषणही मिळतं. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स