Mint face pack for skin : एखादा इव्हेंट असेल, लग्न असेल, मीटिंग असेल तेव्हा नेमक्या वेळी चेहऱ्यावरील पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा टॅनिंग या समस्या सगळा मूड घालवतात याचा अनुभव अनेकांना नेहमीच येत असेल. या समस्या काही नवीन नाहीत. पण या समस्या दूर करण्यासाठी केमिकल्स उत्पादनांऐवजी तुम्ही नॅचरल गोष्टी चेहऱ्यावर लावू शकता. जेणेकरून साइड इफेक्ट्स होणार नाहीत आणि चेहऱ्यावर नॅचरली ग्लो येईल. जुन्या काळापासून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक नॅचरल (Natural Home Remedies for Skin) गोष्टी चेहऱ्यावर लावल्या जातात. असाच एक उपाय म्हणजे पदीन्याची पानं. आम्ही तुम्हाला पदीन्याचे काही फेसपॅक सांगणार आहोत.
ब्लॅकहे्डस, टॅनिंग आणि पिंपल्सपासून सुटका मिळवायची असेल तर पदीना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. महत्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यात पदीन्यानं त्वचेला थंडावा देखील मिळतो. पदीन्यापासून दोन फेसपॅक (Mint Face Pack) कसे तयार करायचे आणि ते कसे लावावे याबाबत जाणून घेऊ.
पदीना आणि केळी
केळ्यामध्ये व्हिटामिन ए, बी, सी यासोबतच भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. पदीन्यासोबत केळी मिश्रित करून तयार केलेला फेसपॅक लावल्यानं त्वचा तर चांगली होतेच सोबतच ब्लॅकहेड्स दूर होतात आणि रोमछिद्रे चांगल्याप्रकारे मोकळी होतात. तसेच चेहऱ्यावरील डागही दूर करण्यासाठी केळ्याचा आणि पदीन्याचा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो.
फेसपॅक कसा तयार कराल?
केळी आणि पदीन्याची पाने चांगल्याप्रकारे मिक्स करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर सामान्य पाण्यानं चेहरा धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
लिंबू आणि पदीना
पदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अॅसिड आढळतं, ज्याने पिंपल्स दूर होतात. तर लिंबू चेहऱ्यावर एकप्रकारे ब्लीचिंगचं काम करतं. पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग झाले असतील तर लिंबू आणि पदीन्याचा हा फेसपॅक या डागांना कमी करण्याचं काम करतो.
कसा कराल तयार?
लिंबू आणि पदीन्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी १० ते १२ पदीन्याची पानं घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करा. ही पानं चांगली बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर काही वेळासाठी लावून ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यावर साध्या पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून २ वेळा लावू शकता.
पदीना आणि हळद
पदीना आणि हळदीचा फेसपॅक तयार करण्यासाठी बाजारातून पदीन्याची पानं घेऊन या. ही पानं धुवून बारीक करा आणि मिक्सरमधून यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीमध्ये टाका आणि त्यात थोडी हळद टाका. तसेच थोडं गुलाबजल टाकून चांगलं मिक्स करा. चेहरा पाण्यानं धुवून फेसपॅक चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यावर साध्या पाण्यानं चेहरा धुवून घ्या.
पदीना आणि मुलतानी माती
पदीना आणि मुलतानी मातीच्या फेसपॅक तयार करण्यासाठी पदीन्यांच्या पानांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीत काढा आणि त्यात मुलतानी माती टाका. त्यात थोडं गुलाबजल टाका आणि दोन चमचे दही टाका. हे चांगलं मिक्स करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होईपर्यंत तशीच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या.