लहान मुलांना आपण रोज दूध प्यायला लावतो. कारण आरोग्यासाठी ते फार पौष्टिक असते. मात्र फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही दूध वापरले जाते. (milk skin care tips, how to apply milk on skin , who should not apply it )दूध हा त्वचेसाठी एक नैसर्गिक, पोषणमूल्यांनी भरलेला पदार्थ आहे. ज्याचा वापर सौंदर्य उपचारांमध्ये जुन्या काळापासून केला जात आहे. दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड, जीवनसत्त्व 'ए' तसेच 'डी' आणि 'ई' असते. त्यात प्रथिने असतात. फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते त्वचेला पोषण देतात. त्यांच्यामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचा जास्त उजळते.
दुधामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड हे एक सौम्य एक्सफोलिएंट आहे. जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला उजळ, मृदू आणि समतोल बनवते . तसेच, दुधामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड्स त्वचेला हायड्रेट करतात आणि तिची लवचिकता वाढवतात.
१. दुधाचा वापर त्वचेसाठी विविध प्रकारे केला जाऊ शकतो. दुधाचा थेट वापर करण्यासाठी, थंड दूध कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हे त्वचेला थंडावा देऊन तिचा मऊपणा वाढवते.
२. दूध आणि बेसन हे मिश्रण त्वचेसाठी अगदी मस्त आहे. दुधामध्ये बेसन आणि हळद मिसळून फेस पॅक तयार करून लावल्यास त्वचेला पोषण मिळते आणि ती उजळते. दुधाच्या पाण्याने अंघोळही केली जाते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात १ ते २ कप दूध घालून १५ ते २० मिनिटे भिजवायचे. ते त्वचेला मृदू आणि पोषणयुक्त बनवते.
मात्र दुधाचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कच्च्या दुधामध्ये बॅक्टेरिया असू शकतात, जे संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे, संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी दुधाचा वापर करण्यापूर्वी त्वचेच्या एका लहान भागावर चाचणी करावी. तसेच, दुधाची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी दुधाचा वापर टाळावा .
एकूणच, दूध हा त्वचेसाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. जो त्वचेला पोषण देतो, मऊ करतो आणि तिचा छान उजळते. योग्य प्रकारे आणि काळजीपूर्वक वापरल्यास, दुधाचा त्वचेच्या आरोग्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.