Join us
Daily Top 2Weekly Top 5

चमचा मसाज ऐकलाय? 'या' पद्धतीने रोज सकाळी २ चमचे चेहऱ्यावरून फिरवा-इन्स्टंट ग्लो-चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 16:45 IST

Skin Care Tips: दिवसाच्या सुरुवातीलाच जर २ चमचे घेऊन तुम्ही हे खास काम केलं तर नक्कीच त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येईल.(massaging your face with spoon)

ठळक मुद्दे पोहे खाण्याचे चमचे यासाठी ठिक आहेत फक्त ते थोडे मोठ्या आकाराचे असावेत.

त्वचेवर ग्लो असावा, आपला चेहरा छान चमकदार, तुकतुकीत दिसावा असं कोणाला वाटत नाही. दिवसभर चेहरा छान फ्रेश राहावा म्हणून आपण चेहऱ्याला दिवसभरातून किती वेगवेगळे क्रिमही लावत असतोच.. पण तरीही समाधान वाटेल असा काही बदल आपल्या त्वचेमध्ये जाणवत नाही. म्हणूनच ते सगळे महागडे उपाय सोडा आणि पुढे सांगितलेला हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला १ पैसाही खर्च करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या घरातले २ चमचे एका विशिष्ट पद्धतीने चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत (benefits of spoon massage for skin). रोज जर नियमितपणे तुम्ही हा उपाय केला तर मग अवघ्या काही दिवसांतच बघा चेहऱ्यावर कसं तेज येतं...(massaging your face with spoon)

 

त्वचेवर ग्लो आणणारा चमचा मसाज

आधी सांगितल्याप्रमाणे हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे लागणार आहेत. पोहे खाण्याचे चमचे यासाठी ठिक आहेत फक्त ते थोडे मोठ्या आकाराचे असावेत. आता रात्री झोपण्यापुर्वी हे चमचे फ्रिजरमध्ये ठेवून द्या. सकाळी उठल्यानंतर थंडगार झालेले चमचे हातात घ्या आणि त्या दोन्ही चमच्यांच्या मदतीने चेहऱ्याला मालिश करा.

नीतू कपूर म्हणतात आलिया भट अत्यंत कडक शिस्तीची आई! .. राहाला आतापासूनच 'या' गोष्टींना बंदी

डोळ्यांवर काही सेकंद चमचे ठेवा. यामुळे डोळ्यांना छान थंडावा मिळेल. त्यानंतर कपाळ, गाल, डोळ्यांच्या आजुबाजुचा भाग, डोळे ते कान यांच्यामधला भाग याठिकाणीही चमच्याने मालिश करा.

 

यानंतर नाकाच्या जवळचा भाग, हनुवटी, जॉ लाईन, गालाकडून कपाळाकडे जाणारा भाग या ठिकाणीही मालिश करा. त्वचेला थोडा ताण द्या जेणेकरून चेहऱ्यावरचे सगळे प्रेशर पॉईंट्स दाबले जातील. साधारण ५ मिनिटे या पद्धतीने मालिश केल्यास तुम्हाला त्वचेमध्ये कित्येक बदल जाणवतील.

अधिक मास २०२६ : अधिकात जोडवी तर घेतातच, सोबत घ्या दागिन्यांचे पारंपरिक प्रकार-बिछवे, मासोळ्या, करंगुळ

मालिश केल्याने त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होऊन त्वचेवर ग्लो येईल. चेहऱ्यावरील सूज कमी होईल. काही जणांना डोळ्यांखाली सूज येते. ती घालविण्यासाठीही हा उपाय चांगला आहे. पिंपल्स, ॲक्ने कमी होतील. काही जणींच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स खूप असल्याने त्वचा थोराड दिसते. हा त्रास घालविण्यासाठीही हा उपाय चांगला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Spoon massage: Get instant glow by massaging face with spoons.

Web Summary : Try spoon massage for glowing skin. Keep spoons in freezer overnight. Massage face for five minutes daily. Reduces puffiness, acne, and open pores.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी