Best Oil for Skin Massage: हिवाळा हा स्किन केअरसाठी उत्तम मानला जातो. पण थंड वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी पडते, फाटते आणि ग्लो कमी होऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात चेहऱ्याची नियमितमसाज करणे खूप फायदेशीर आहे. खासकरून रात्री झोपण्याआधी तेलाने फेस मसाज करणे एकदम आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे त्वचा ताणलेली, कोरडी वाटू लागते. अशावेळी मसाज केल्याने त्वचा मुलायम, चमकदार आणि हेल्दी राहते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, चेहऱ्याची मसाज करण्यासाठी कोणतं तेल जास्त फायदेशीर ठरेल? तेच आज आपण पाहणार आहोत.
चेहऱ्याच्या मसाजसाठी बेस्ट तेल
बदाम तेल
बदामाच्या तेलामध्ये व्हिटामिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत मिळते. अशात रोज काही मिनिटे मसाज केल्यास ओलावा टिकून राहतो आणि डीप नरीशमेंट मिळते.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल हे नॅचरल मॉइश्चरायझरसारखं काम करतं. या तेलाने मसाज केल्यास ड्रायनेस कमी होते. मसाज केल्यावर त्वचा मुलायम, एकसारखी आणि कोमल होते. रात्री त्वचेची मसाज करण्यासाठी हे तेल अधिक फायदेशीर ठरतं.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटामिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हे तेल बेस्ट ठरतं. हिवाळ्यात रात्री मसाज केल्यास त्वचेचा पोत सुधारतो.
गुलाब तेल
या तेलामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सन भरपूर असतात. त्यामुळे स्किन टोन सुधारते आणि चेहरा सतेज दिसतो. त्वचा फ्रेश आणि तरुण दिसते.
एरंडी तेल
जर आपली त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर एरंडीचं तेल आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यातील फॅटी अॅसिड्समुळे त्वचा मुलायम होते. तसेच चेहऱ्यावरील ताण आणि ड्रायनेस कमी होतो. या तेलाने मालिश करायची असेल तर याचे 1 ते 2 थेंब पुरेसे आहेत.
चेहऱ्याची मसाज कशी करावी?
आपल्या त्वचेनुसार कोणतेही तेल निवडा. तेल हातात घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने मसाज सुरू करा. कपाळ, गाल, नाक, हनुवटी प्रत्येक भागावर समान वेळ द्या. मसाज केल्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि तेल त्वचेच्या खोल थरापर्यंत पोहोचतं. तेल रात्री तसंच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
