आजकाल बरचेजण वेगवेगळी सौंदर्य उत्पादनं वापरण्याच्या प्रयत्नात असतात. पण कितीही पैसे खर्च केले तरी हवा तसा ग्लो मिळत नाही. दूध फक्त तब्येतीसाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरते.दुधानं स्नान करण्याची परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. दुधात बरेच औषधी गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. बाजारात मिळणारे साबण, फेसवॉश यातही दुधाचा वापर केला जातो.
दूध आपल्या स्किनकेअर रूटीनमध्ये असायलाच हवं. रोज चेहरा धुतल्यानंतर दुधानं मसाज केल्यास चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होईल. तसंच जर तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही कच्चं दूध चेहऱ्याला लावू शकता. (Massage your face with raw milk for just 5 minutes to get glowing skin)
चेहऱ्याला कच्च दूध लावण्याचे फायदे
दूध त्वचेवर नॅच्युरल क्लिंजरप्रमाणे काम करते. कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं पूर्ण चेहऱ्यावर कच्च दूध लावल्यास त्वचा नैसर्गिकरित्या साफ दिसण्यास मदत होईल. तसंच यामुळे डेड स्किन सेल्स निघून जातील आणि त्वचा स्वच्छ दिसते.
रोज चेहऱ्यावर दूध लावल्यास त्वचेचं डिप क्लिनिंग होईल. तसंच त्वचेचं तेज वाढवण्याही मदत होईल. कच्च्या दूधात अनेक पोषक तत्व असतात जे त्वचेला ग्लोईंग बनवतात. यामुळे स्किन केअर रूटीनमध्ये याचा समावेश करा. दूधानं मालिश केल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
ज्या लोकांच्या चेहऱ्यावर डाग आहे. त्यांनी या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा. कच्चं दूध त्वचेला मॉईश्चर देतं. त्वचा सॉफ्ट होण्यास मदत होते. ज्यामुळे एजिंग कमी होते.
कोरड्या, निस्तेज त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्च दूध त्वचेला मॉईश्चर देतं. तर तुमची त्वचा कोरडी झाली असेल एकदम सॉफ्ट नसेल तर तुम्हाला एजिंग कमी होण्यास मदत होईल.
कच्चं दूध त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. यात बरेच औधषी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचा रंग स्वच्छ होतो. जर चेहरा काळा पडला असाल तर तुम्ही कच्चं दूध लावू शकता. पण हे प्रत्येकालाच सूट करेल असं नाही. म्हणून पहिल्यांदा चेहऱ्याला कच्च दूध लावत असाल तर पॅच टेस्ट नक्की करा.
