Join us

पन्नाशीतही मलायका अरोराच्या त्वचेवर सुरकुत्या नाहीत, बघा तरुण- चमकदार त्वचेसाठी तिचा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2024 19:35 IST

Malaika Arora's Beauty Secret For Wrinkle Free Skin: मलायका अरोरा तिच्या त्वचेला यंग आणि चमकदार ठेवण्यासाठी बघ नेमका काय उपाय करते... 

ठळक मुद्देयोगा आणि त्वचेसाठी ती करत असलेल्या काही खास गोष्टी यामुळे तिच्या सौंदर्यात कणभरही कमीपणा आलेला नाही.

मलायका अरोराचं सौंदर्य आणि फिटनेस हा तर नेहमीच अनेकांसाठी चर्चेचा विषय असतो. या दोन्ही गोष्टींच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे ती नियमितपणे करते तो व्यायाम आणि योगा. दररोज ठराविक वेळेसाठी न चुकता व्यायाम केल्यामुळे मलायका वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसते. योगा आणि त्वचेसाठी ती करत असलेल्या काही खास गोष्टी यामुळे तिच्या सौंदर्यात कणभरही कमीपणा आलेला नाही. तिच्या त्वचेवर फाईन लाईन्स किंवा सुरकुत्याही नाहीत (Malaika arora's beauty secret for wrinkle free young looking skin). यासाठी ती नेमका काय उपाय करते, याविषयीचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (home remedies for glowing skin)

 

मलायका अरोराच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट

मलायका अरोराचा एक व्हिडिओ काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती त्वचेला कोणता फेसपॅक नियमितपणे लावते, याविषयीची माहिती तिने शेअर केली होती.

नवऱ्याचे कौतुक करण्याचा आणि त्याला धन्यवाद म्हणण्याचा खास दिवस, जगभर साजरा झाला कारण...

तिचा तो व्हिडिओ ॲटॅच करून एक पाेस्ट fashoholic_kanchan या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे असून त्यामध्ये मलायका जो उपाय करते, तो करून दाखवण्यात आला आहे.

त्या व्हिडिओनुसार मलायका जो फेसपॅक लावते, त्यासाठी आपल्याला ३ पदार्थ लागणार आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे दालचिनीची पावडर. दुसरा पदार्थ आहे लिंबाचा रस तर तिसरा पदार्थ आहे चमचाभर मध.

 

हे ३ पदार्थ तयार करून त्यांची एकत्रित पेस्ट तयार करा. यानंतर चेहरा थोडा ओलसर करून त्यावर हा लेप लावा.

१० ते १५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाकावा. यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार राहण्यास मदत होते.

लाडक्या मुलीसाठी जुन्या साडीचं परकर पोलकं शिवायचंय? बघा ६ सुंदर डिझाईन, लेक दिसेल देखणी

पण हा प्रयोग ज्यांनी प्रत्यक्ष करुन पाहिला आहे, त्यांच्यामते हे सगळे पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे ते त्वचेवर लावल्यानंतर काही सेकंदासाठी त्वचेची जळजळ होते. पण त्यानंतर मात्र त्वचेवर खूप छान ग्लो आल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे हा प्रयोग करण्याआधी पॅच टेस्ट जरुर करा. जर तुम्हाला सहन झालं, तरच हा उपचार करून पाहा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमलायका अरोराहोम रेमेडी