मलायका अरोरा हे बॉलीवूडमधलं एक कायम चर्चेत असणारं नाव. कधी ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेत येते. तर कधी तिच्या अफेअर्स आणि बोल्ड विधानांमुळे तिच्याविषयीची चर्चा होत असते. एक मात्र खरं की तिच्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी जेव्हा तिच्या सौंदर्याचा आणि फिटनेसचा विषय येतो, तेव्हा मात्र सगळेच तिचं कौतूक करतात. योगा, व्यायाम, डाएट या गोष्टी सातत्याने सांभाळून तिने तिचं सौंदर्य जपलं आहे. म्हणूनच तर आज ५१ वर्षांची होऊनही मलायकाचा चेहरा कुठेही वयस्कर महिलांसारखा दिसत नाही. खरंतर या वयातल्या महिलांच्या चेहऱ्यावर बऱ्याचशा सुरकुत्या दिसतात. डोळ्यांखालची त्वचा सुजलेली दिसते (4 remedies for young glowing skin like Malaika arora). चेहरा फुगीर आणि प्रौढ झालेला वाटतो (Malaika arora's beauty secret). जाॅ लाईनचा आकार पुर्णपणे बिघडलेला असतो (how to get rid of fine lines on skin?). पण मलायकाच्या बाबतीत असं काहीच दिसत नाही, कारण.....
५१ वर्षांची होऊनही मलायका अरोरा एवढी तरुण, सुंदर कशी?
फिट राहण्यासाठी आपल्या शरीराला जशी व्यायामाची गरज असते, तशीच गरज आपल्या चेहऱ्याच्या त्वचेलाही असते. चेहऱ्याच्या त्वचेचा लवचिकपणा टिकवून ठेवण्यासाठी आपला आहार तर योग्य असायलाच हवा पण त्याशिवाय आपण काही व्यायामही नियमितपणे करायला हवे.
फक्त १ चमचा खोबऱ्याची चटणी रोज जेवणात खा- मिळतील ७ जबरदस्त फायदे
तेच व्यायाम मलायका अरोरा नियमितपणे करते. त्यामुळेच ५१ वर्षांची होऊनही अगदी पंचविशीतल्या तरुणीलाही लाजवेल एवढी तजेलदार, टवटवीत त्वचा तिने टिकवून ठेवली आहे. तुम्हीही मलायकाप्रमाणे काही व्यायाम नियमितपणे करून त्वचेचं सौंदर्य जपू शकता. ते व्यायाम नेमके कोणते ते पाहा...
१. पहिला व्यायाम करण्यासाठी दिर्घ श्वास घेऊन गाल फुगवा. आता जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ गाल फुगवलेले राहू द्या आणि उजव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांनी ओठांवर दाब द्या. यामुळे गाल प्रमाणात राहतात. लोंबलेले दिसत नाहीत.
२. यानंतर बाेटाच्या टोकांनी चेहऱ्यावर हळुवारपणे टॅपिंग करा. कपाळापासून ते गळ्यापर्यंत साधारण १ मिनिट टॅपिंग करा. यामुळे त्वचेच्या खालच्या भागात चांगला रक्तप्रवाह होतो आणि त्यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
रवा आणि आंब्याचा सुपरस्पाँजी मँगो केक! मुलांना सुटीत द्या मस्त ट्रिट, घ्या अगदी सोपी रेसिपी..
३. यानंतर फिश माऊथ पोझ करा. म्हणजेच दोन्ही गाल आतल्या बाजुने ओढून घ्या आणि मान वर करून आकाशाकडे बघा. यामुळे जॉ लाईन चांगली होऊन गळ्याभोवती जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.
४. चौथा व्यायाम म्हणजे दिर्घ श्वास घेऊन दोन्ही गाल फुगवा. त्यानंतर एका गालावर दाब द्या. असंच दुसऱ्या बाजुनेही करा.