त्वचेच्या अनेक समस्यांपैकी ॲक्ने ही सर्वात मोठी आणि कॉमन समस्या आहे. काहीजणांच्या त्वचेवर ॲक्ने यायला सुरुवात झाली की ते जाता जात नाहीत, अशावेळी हे त्वचेला त्रासदायक ठरणारे ॲक्ने नकोसे वाटतात. या वारंवार येणाऱ्या ॲक्नेमुळे आपल्या त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही बिघडून जाते. यामुळे त्वचेचा पोत बिघडून त्वचा खराब दिसू लागते. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि ॲक्ने फार मोठ्या प्रमाणात येतात(Acne-Fighting Face Masks To Try At Home).
चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर एकही पिंपल्स किंवा डाग नसतात. चेहर्यावरील पिंपल्स किंवा काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्सच (Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin) वापरले जातात. परंतु या प्रॉडक्ट्समधील रासायनिक घटकांमुळे एक तर ही समस्या आणखी वाढते किंवा त्वचेच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या कारणांनी आलेले पिंपल्स, ॲक्ने, फोड व त्यांचे काळे डाग कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करुन पाहू शकतो. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पार्लरला न जाता घरच्याघरीच वेगवेगळ्या प्रकारचे 'देसी नुस्खे' ट्राय करुन पाहात असते. त्वचेवरील ॲक्नेची समस्या कायमसाठी दूर करण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोरा हिने खास कोणता घरगुती उपाय सांगितला आहे ते पाहूयात( Malaika Arora Uses This Home Remedy To Get Rid Of Acne & Pimples).
ॲक्ने प्रॉब्लेम कमी करण्यासाठी फेसपॅक...
ॲक्ने प्रॉब्लेम कमी करण्यासाठी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला १/२ टेबलस्पून दालचिनी पावडर, १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून लिंबाचा रस इतक्या फक्त तीनच गोष्टींची गरज लागणार आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये, १/२ टेबलस्पून दालचिनी पावडरमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि लिंबाचा रस मिक्स करुन घ्यावा. आता या तिन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करुन तयार झालेला फेसपॅक त्वचेवरील ज्या भागात ॲक्ने आहे त्या भागावर लावून घ्यावा. त्यानंतर हा फेसपॅक त्वचेवर १५ ते २० मिनिटे किंवा संपूर्णपणे सुकेपर्यंत ठेवावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून हा फेसपॅक त्वचेवरुन काढून घ्यावा. त्वचेवरील ॲक्नेची समस्या कमी करण्यासाठी हा फेसपॅक वापरणे अधिक फायदेशीर ठरेल.
इतरही टिप्स लक्षात ठेवा...
१. त्वचेवरील ॲक्नेची समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर कोणत्याही प्रकारची घाण साचू देऊ नका. जर तुम्ही मेक-अप केला असेल तर रात्री चेहऱ्यावरील मेक-अप काढून चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच झोपा.
२. त्वचेसाठी खूप कडक किंवा रफ ब्रश वापरु नका याचबरोबर कठोर स्क्रब देखील वापरणे टाळा.
३. ॲक्नेची समस्या कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. जास्त तेलकट पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवू नका.
हिवाळ्यात टाचा फुटल्या-चालता येत नाही ? करा मेणबत्तीचा एका खास उपाय, भेगा होतील कमी...
४. केसांचीही काळजी घ्या. केस घाणेरडे असतील आणि वारंवार चेहऱ्यावर पडत असतील तर त्यामुळे देखील ॲक्नेची समस्या होऊ शकते. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
५. चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा आणि ऑइलबेस्ड मेकअपचा वापर करावा.
६. चेहऱ्यावरील केस काढताना, रेझर स्वच्छ असल्याची किंवा वापरल्या जाणाऱ्या उत्पादनाचे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री करा.