Rice Flour Face pack : तांदळाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. वेगवेगळ्या पद्धतींना आहारात तांदळाचा समावेश केला जातो. भाताचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. सोबतच त्वचेसाठी देखील तांदूळ वरदान ठरू शकतात. पण अनेकांना तांदळाचे त्वचेला होणारे फायदे माहीत नसतात. जर आपल्याला तांदळाचे त्वचेला होणारे फायदे समजले तर आपण अनेक महगाडे ब्यूटी प्रॉडक्ट्स घरातून बाहेर फेकाल.
तांदळाचं पाणी किंवा पीठ जर चेहऱ्यावर लावलं तर त्वचे चमकदार, मुलायम आणि सतेज होते असं अनेक ब्यूटी एक्सपर्ट सांगतात. अशात आता तर उत्सवांचा सीझन आहे. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण तांदळाचा वापर करू शकता.
चेहऱ्यावर कसं लावाल तांदळाचं पीठ?
या लेखात आज आपण सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक तांदळाची फेसपॅक रेसिपी बघणार आहोत. हा फेसपॅक लावून चेहरा नॅचरली चमकदार होऊ शकतो. या फेसपॅकचा व्हिडीओ कंटेंट क्रिएटर ग्रिन्सी गांधी यांनी यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.
कसा बनवाल फेसपॅक?
हा फेसपॅक बनवण्यासाठी आपल्या आधी तांदळाचं पीठ लागेल. त्यात थोडं मध आणि कच्च दूध टाकून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटं तशीच लावून ठेवा. हा उपाय १०० दिवस करण्याचा सल्ला ग्रिन्सी गांधी यांनी दिलाय. ज्यानं त्वचा चमकदार आणि सजेत होईल.
व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
कसे मिळतात फायदे?
तांदळाचं पीठ त्वचेला नॅचरली एक्सफोलिएट करतं. त्यासोबतच यानं त्वचेवर जमा डेड स्किन दूर होते आणि त्वचा मुलायम व ग्लोईंग होते.
तर मधानं त्वचा आतपर्यंत मॉइश्चराइज होते. मधानं त्वचा ड्राय होण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर त्वचा मुलायम व चमकदारही होते.
तसेच कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड असतं. जे त्वचेची आतपर्यंत सफाई करतं. सोबतच टॅनिंगची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.