Join us

तुळशीचे हे '३' फेस मास्क घरी करा ५ मिनिटांमध्ये, त्वचेसाठी ठरतात अगदी फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 12:27 IST

Make these '3' Tulsi face masks at home in 5 minutes, they are very beneficial for the skin : चेहरा छान चमकेल आणि दिसेल ताजातवाना फक्त हे तुळशीचे मास्क लावा नियमित.

तुळस दारी हसायलाच हवी अशी भारतीय मान्यता आहे. फक्त धार्मिक कारणांमुळे नाही तर आयुर्वेदात ही तुळशीला फार महत्त्व आहे.(Make these '3' Tulsi face masks at home in 5 minutes, they are very beneficial for the skin) तुळस ही एक औषधी वनस्पती मानली जाते.तुळशीतील अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच अँण्टीऑक्सिडंट्स आणि अँण्टीइंफ्लेमेटरी गुणधर्मांनी तुळस परिपूर्ण असते. तुळशीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा फैलाव कमी करतात.  तुळशीतील हे गुणधर्म आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुळस जशी खाण्यासाठी वापरता येते तशीच तिचा वापर ब्यूटी प्रॉडक्ट्समध्येही केला जातो. बाजारात तुळशीचे अनेक प्रॉडक्ट्स मिळतात. तसेच घरीही तुळशीचे लेप, पॅक करता येतात.  तुळशीच्या पानांचा वापर करून विविध प्रकारचे फेस पॅक तयार करणे अगदी सोपे आहे. असे उपाय केल्यावर ब्यूटी पार्लरचा खर्च नक्कीच वाचेल. तुळशीचे असे तीन फेस पॅक करुन नक्की लावून पाहा. तिन्ही कमालीचे फायदे देतात.  

१. १० ते १५ तुळशीची पाने घ्यायची. व्यवस्थित वाटून घ्यायची. मिक्सरमध्ये फिरवा किंवा मग कुटून घ्या. नंतर त्यात दोन ते तीन चमचे कोरफडीचा अर्क घालायचा. छान मिक्स करायचे आणि तो मास्क चेहर्‍याला लावायचा.  १५ ते २० मिनिटांसाठी मास्क चेहऱ्यावर ठेवायचा मग धुवायचा. हा पॅक मुरुमांच्या समस्येतून सुटका करतो. तसेच त्वचा तरोताजी दिसते.  

२. तुळशीची पाने वाटून घ्यायची. त्यात चमचाभर हळद घालायची. हळद घातल्यावर थोडे गुलाब पाणी ओतायचे. अगदी काही थेंब. तिन्ही पदार्थ एकजीव करायचे आणि तो मास्क चेहर्‍याला लावायचा. त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी या मास्कचा फायदा होईल. तसेच त्वचा उजळवण्यासाठी असा मास्क वापरावा.  

३. तुळशीची पाने आणि कडुलिंबाची पाने घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि मग त्या पानांची वाटून पेस्ट करायची. घट्ट पेस्ट करा जास्त पातळ नको. ती पेस्ट चेहऱ्याला लावायची आणि २० मिनिटे ठेवायची. नंतर चेहरा स्वच्छ धुवायचा. या मास्कमुळे चेहऱ्याला पोषण मिळेल. सगळ्याच त्रासांवर फायदेशीर ठरेल. दोन्ही पाने त्वचेसाठी फार पोषक असतात. 

टॅग्स :त्वचेची काळजीआरोग्यहोम रेमेडी