Join us

बिटाचं हे खास फेशिअल करा, महागडे प्रॉडक्ट्स विसराल आणि पार्लरमध्ये जाणंच सोडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 20:29 IST

Beetroot Facial Tips: बिटाचा वापर करून तुम्ही त्वचा कशाप्रकारे हायड्रेट, ग्लोइंग आणि मुलायम ठेवू शकता. या खास बीटरूट फेशिअलचा वापर केला तर तुम्हाला ब्युटी पार्लरमध्येही जाण्याची गरज पडणार नाही.

Beetroot Facial Tips: आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी केला जाऊ शकतो. या गोष्टी आपल्या एकंदर आरोग्यासाठीही चांगल्या असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे बीट. बिटामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, फोलेट, बीटा कॅरोटीनसारखे पोषक तत्व आढळतात. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. अशात बिटाचा वापर करून तुम्ही त्वचा कशाप्रकारे हायड्रेट, ग्लोइंग आणि मुलायम ठेवू शकता. या खास बीटरूट फेशिअलचा वापर केला तर तुम्हाला ब्युटी पार्लरमध्येही जाण्याची गरज पडणार नाही.

बीटरूट फेशिअल (Viral Beetroot Facial)

इन्स्टाग्रामवर jay.shreekitchen नावाच्या पेजवर बीटरूट फेशिअल करण्याच्या टिप्स शेअर करण्यात आल्या आहेत. हे टू स्टेप फेशिअल करून तुम्ही त्वचा ग्लोइंग, चमकदार, क्लीअर आणि रिंकल्स फ्री बनवू शकता.

बीटरूट फेशिअल करण्यासाठी सगळ्यात आधी एक बीट किसून त्याचा रस काढा.बीटरूट स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा बिटाच्या रसात एक चमचा कॉफी पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि हातानं मसाज करा. यानं त्वचेवरील डेड स्कीन निघून, तसेच ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्स समस्याही कमी होईल.

नंतर एक चमचा बीटरूट रसात अर्धा चमचा पीठ आणि बेसन मिक्स करून फेसपॅक तयार करा. हे चेहऱ्यावर आणि माननेवर १५ मिनिटांसाठी लावा. त्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवून घ्या.

अशाप्रकारे तुम्ही २० रूपयातच स्पेशल फेशिअल तयार करून ग्लोइंग, हायड्रेटिंग आणि मुलायम त्वचा मिळवू शकता.

चेहऱ्यावर बीट लावण्याचे फायदे (Benefits Of Applying Beetroot On Face)

बिटामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, आयर्न आणि भरपूर मिनरल्स असतात, जे त्वचा ग्लोइंग करतात. सोबतच डाग दूर करण्यासही मदत करतात. ज्यामुळे त्वचा नॅचरल पिंक टोन दिसते.

बिटांच्या रसामध्ये बेटालेंस आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जे त्वचेचा रंग सुधारतात आणि त्वचा ग्लोइंग आणि उजळ करतात.

बिटामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे पिंपल्सनंतर पडणारे काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करतात.

ऑयली आणि पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी बिटाचा रस खूप फायदेशीर असतो. कारण यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे पिंपल्सचं इन्फ्लेमेशन आणि रेडनेस कमी करतात.

जर तुमची त्वचा खूप ड्राय असेल आणि क्रॅक दिसत असतील तर बिटाच्या रसाचा वापर करून तुम्ही त्वचा हायड्रेट करू शकता. इतकंच नाही तर बिटाचा रस ओठ रंगवण्यासाठीही कामात येतो. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स