Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > तळपायांना सतत भेगा? क्रिम चोपडणं सोडा आणि हे पदार्थ खा, बघा भेगांमागचं खरं कारण 

तळपायांना सतत भेगा? क्रिम चोपडणं सोडा आणि हे पदार्थ खा, बघा भेगांमागचं खरं कारण 

Health Tips: तळपायांना सतत भेगा पडत असतील तर त्यामागचं मुख्य कारण हे तुमच्या शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, हे असू शकतं...(main reason and causes of cracked heel)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 16:28 IST2025-11-06T16:27:20+5:302025-11-06T16:28:43+5:30

Health Tips: तळपायांना सतत भेगा पडत असतील तर त्यामागचं मुख्य कारण हे तुमच्या शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, हे असू शकतं...(main reason and causes of cracked heel)

main reason and causes of cracked heel, deficiency of which vitamin causes cracked heel  | तळपायांना सतत भेगा? क्रिम चोपडणं सोडा आणि हे पदार्थ खा, बघा भेगांमागचं खरं कारण 

तळपायांना सतत भेगा? क्रिम चोपडणं सोडा आणि हे पदार्थ खा, बघा भेगांमागचं खरं कारण 

Highlightsतळपायाच्या भेगा कमी करण्यासाठी जशी बाहेरून क्रिम लावून त्याला मऊपणा देण्याची गरज आहे, तशीच गरज तुमच्या शरीराला आतून पोषण देण्याचीही आहे.

हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांच्या पायाला खूप भेगा पडलेल्या दिसतात. कारण या दिवसांमध्ये वातावरणात जो बदल झालेला असतो, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो आणि तळपायाला भेगा पडतात. पण काही जण असेही असतात की त्यांच्या पायावर १२ महिने भेगा असतात. या भेगा कधी कधी एवढ्या वाढतात की त्यातून रक्तही येतं. पायावरच्या भेगा कमी करण्यासाठी मग अनेकजणी बाजारात मिळणारे वेगवेगळे क्रिम वापरायला सुरुवात करतात. पण त्याचाही म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तळपायाच्या भेगा कमी करण्यासाठी जशी बाहेरून क्रिम लावून त्याला मऊपणा देण्याची गरज आहे, तशीच गरज तुमच्या शरीराला आतून पोषण देण्याचीही आहे (main reason and causes of cracked heel). कारण तळपायावरच्य भेगा म्हणजे तुमच्या शरीरात काही घटकांची कमतरता आहे, हे सांगणारं एक महत्त्वाचं लक्षण आहे.(deficiency of which vitamin causes cracked heel)

 

कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे तळपायाला भेगा पडतात?

१. व्हिटॅमिन ई त्वचेला मॉईश्चराईज ठेवते. पेशींना मऊ आणि लवचिक ठेवते. जर शरीरात व्हिटॅमिन ई कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे पायांच्या भेगांंमागे ते एक कारण असू शकतं. यासाठी बदाम, शेंगदाणे, अव्हाकॅडो, सुर्यफुलाच्या बिया असे पदार्थ तुमच्या आहारात असायला हवे.

क्रिकेटपटू हरलीन देओलने चक्क पंतप्रधान मोदींनाच विचारलं, सर तुमचा चेहरा एवढा ग्लो करतोय, स्किन केअर सांगा.. 

२. तळपायाच्या भेगा वाढण्यामागे व्हिटॅमिन सी ची कमतरता हे देखील एक कारण असू शकतं. त्वचेचं रिपेअरिंग आणि त्वचेमध्ये काेलॅजीन निर्माण करणे हे व्हिटॅमिन सी चं काम असतं. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असतं तेव्हा त्वचेची स्वत:मध्ये सुधारणा करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे मग पायांवरच्या भेगा वाढतात. यासाठी पेरू, लिंबुवर्गीय फळं, आवळा, टोमॅटो, ब्रोकोली नियमितपणे खायला हवं.

 

३. व्हिटॅमिन बी, झिंक आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड या घटकांच्या कमतरतेमुळेही पायांवरच्या भेगा वाढत जातात. त्वचेमध्ये नॅचरल ऑईल टिकून राहण्यासाठी ओमेगा ३ उपयुक्त असतं.

पोट सुटलंय; पण व्यायामाला वेळच नाही? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, काही दिवसांत पोट सपाट

तर त्वचेवरचे घाव लवकर भरून येण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात झिंक असणं गरजेचं आहे. तसेच व्हिटॅमिन बी सुद्धा त्वचा लवचिक, तरुण ठेवण्यासाठी गरजेचं आहे. म्हणूनच हे घटक देणारे पदार्थही आपल्या आहारात नियमितपणे असायलाच हवे. 

 

Web Title : फटी एड़ियों का इलाज: राहत के लिए ये खाएं, क्रीम छोड़ें।

Web Summary : फटी एड़ियां अक्सर विटामिन की कमी का संकेत देती हैं। विटामिन ई, सी, बी, जस्ता और ओमेगा-3 महत्वपूर्ण हैं। अपने आहार में बादाम, खट्टे फल और बीज शामिल करें।

Web Title : Cracked heels remedy: Eat these foods, skip creams for relief.

Web Summary : Cracked heels often signal vitamin deficiencies. Vitamin E, C, B, zinc, and omega-3 are crucial. Include almonds, citrus fruits, and seeds in your diet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.