Glowing Skin Tips : सोशल मीडियावर आपण कोरिअन ग्लास स्किन ट्रेंड नक्कीच पाहिला असेल. ही स्किन खूपच क्लीन, चमकदार आणि आतून उजळल्यासारखी दिसते. चांगली गोष्ट म्हणजे हा ग्लो तुम्ही घरच्या घरी, महागडे प्रोडक्ट्स न वापरताही मिळवू शकता. खाली दिलेले सोपे आणि नैसर्गिक उपाय तुम्हाला पार्लरसारखा ग्लो देऊ शकतात.
अॅलोव्हेरा जेल क्लिनिंग
कोरिअन ग्लो मिळवण्यासाठी सर्वात आधी चेहरा नीट स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे. यासाठी अॅलोवेरा जेल आणि गुलाबजल मिसळा. कॉटनच्या मदतीनं हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ, माती आणि घाम स्वच्छ होतो आणि स्किन फ्रेश होते.
अॅलोव्हेरा स्क्रबिंग
स्क्रबिंगमुळे डेड स्किन सेल्स काढून टाकले जातात आणि ग्लो दिसू लागतो. अॅलोव्हेरा जेलमध्ये तांदळाचे पीठ किंवा बारीक साखर मिसळा. हा स्क्रब चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. नंतर कोमट पाण्याने फेस वॉश करा.
फायदे
टॅनिंग कमी होते
डेड स्किन दूर होते
ब्लॅकहेड्स कमी होतात
चेहरा नैसर्गिकरित्या उजळतो
अॅलोव्हेरा जेल मसाज
चेहऱ्यावर अॅलोव्हेरा जेल लावून वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. स्किन हायड्रेट होते आणि हेल्दी ग्लो येतो.
अॅलोव्हेरा वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
शक्यतो फ्रेश अॅलोव्हेरा वापरा. अॅलोव्हेरा लावल्यानंतर बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन नक्की लावा. अॅलोव्हेरा आठवड्यात फक्त दोन वेळाच वापरा; जास्त वापरल्यास स्किन रफ होऊ शकते. भरपूर पाणी प्या आणि हेल्दी आहार घ्या. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर गेल्यावर त्वचेवर ग्लो वाढतो.
