Join us

१५ दिवसांत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! फक्त २ मिनिटांचा सोपा उपाय, त्वचा होईल चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2024 15:59 IST

2 Minutes Daily Exercise For Getting Natural Glow: त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यासाठी कोणता उपाय करावा असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती एकदा वाचाच...

ठळक मुद्देहा उपाय दररोज नियमितपणे केला तर १५ दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर छान तेज येईल...

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे ज्यांचं लग्न आहे अशा तरुण मुली तर त्वचेवर छान ग्लो येण्यासाठी, त्वचा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय करतच असतात. पण त्यांच्यासोबतच त्यांच्या जवळच्या बहिणी, वहिणी, मैत्रिणी यांचेही वेगवेगळे सौंदर्योपचार चालूच असतात. आता तुम्हालाही लग्नात सुंदर दिसण्यासाठी त्वचेवर नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर हा एक सोपा उपाय अगदी आजपासूनच सुरू करा (how to get natural glow). हा उपाय दररोज नियमितपणे केला तर १५ दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर छान तेज येईल... (just 2 minutes daily exercise for getting natural glow)

 

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणणारा २ मिनिटांचा खास उपाय

चेहऱ्यावर १५ दिवसांत नॅचरल ग्लो येण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ nehafunandfitness या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

यामध्ये जो व्यायाम करायला सांगितला आहे तो अवघ्या २ मिनिटांचा असून तो तुम्हाला एका जागी रिलॅक्स बसून करायचा आहे. शक्यतो सकाळच्या वेळी कोवळ्या सुर्यप्रकाशात आणि फ्रेश हवेत बसून केल्यास अधिक चांगले.

अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्हलेस घालायला नको वाटतं? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल

हा व्यायाम करण्यासाठी सुरुवातीला ताठ बसा. तोंडाने हवा आत घ्या आणि तोंडाचा चंबू करा. उजव्या हाताचे पहिले २ बोटं ओठांवर ठेवा आणि डाव्या हाताने डाव्या गालावर १ मिनिटासाठी टॅपिंग करा. आता नाकाने हवा सोडून द्या.

वरील पद्धतीनेच पुन्हा एकदा श्वास घेऊन उजव्या गालावरही १ मिनिटासाठी टॅपिंग करा. हा व्यायाम केल्यास त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.

 

यासोबतच ही पथ्येही पाळा...चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

१. पुरेशा प्रमाणात पाणी प्या. 

हनुवटीखाली चरबी वाढल्याने चेहरा गुबगुबीत दिसतो? ३ सोपे व्यायाम, जॉ-लाईन होईल परफेक्ट

२. बाहेरचं तेलकट- तुपकट न खाता घरचे सकस अन्न घ्या.

३. ताणतणाव न घेता आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सव्यायामत्वचेची काळजी