Lokmat Sakhi >Beauty > जया किशोरींच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट; लहानपणापासून झोपण्याआधी चेहऱ्याला 'हा' पदार्थ लावतात

जया किशोरींच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट; लहानपणापासून झोपण्याआधी चेहऱ्याला 'हा' पदार्थ लावतात

Jaya Kishori's Beauty Secret : जया किशोरी आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये हा उपाय करतात. या रूटीनमध्ये दोन गोष्टींचा समावेश करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:51 AM2024-05-23T11:51:10+5:302024-05-23T12:02:06+5:30

Jaya Kishori's Beauty Secret : जया किशोरी आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये हा उपाय करतात. या रूटीनमध्ये दोन गोष्टींचा समावेश करा.

Jaya Kishori's Beauty Secret : Jaya Kishori Beauty Secret Effective Home Remedies For Glowing Skin | जया किशोरींच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट; लहानपणापासून झोपण्याआधी चेहऱ्याला 'हा' पदार्थ लावतात

जया किशोरींच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट; लहानपणापासून झोपण्याआधी चेहऱ्याला 'हा' पदार्थ लावतात

ऋतू कोणताही असो स्किनशी संबंधित समस्या प्रत्येकालाच उद्भवतात. खासकरून ऊन्हाळ्याच्या दिवसांत पुळ्या, डाग जास्त दिसू लागतात. (Beauty Tips By Jaya Kishori) ज्यामुळे चेहऱ्याचा रंग रूपच बदलते. जया किशोरी यांचा चेहरा कायम ग्लोईग दिसतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसते, डाग येऊ लागतात. जया किशोरी यांनी  त्यांच्या सुंदरतेचं एक सोपं सिक्रेट सांगितलं आहे. कोणत्याही क्रिम, पावडर वापर न करता ते काही गोष्टी चेहऱ्याला लावतात. हे घरगुती उपाय केले तर तुमचाही चेहरा जया किशोरी यांच्यासारखा ग्लोईग चमकदार दिसेल. (Jaya Kishori Skin Care Tips)

रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला काय लावतात? (What To Apply Before Sleeping)

जया किशोरी हा उपाय रोज झोपताना करतात. हा उपाय ते लहानपणापासूनच करत आले आहेत.त्यांची बहिणसुद्धा हाच उपाय करायची असं त्या व्हिडिओत सांगतात. बेसन  २ चमचे,  दही १ मोठा चमचा, हळद अर्धा चमचा हे साहित्य हा घरगुती पॅक बनवण्यासाठी लागते. 

असा तयार करा फेसपॅक (How To Make Face Pack)

सगळ्यात आधी एक वाटी घ्या त्यात वर नमूद केलेले सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या.  त्यानंतर रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटं तसंच राहू द्या  त्यानंतर साध्या पाण्याने फेस वॉश करून घ्या. चेहरा व्यवस्थित पुसून मॉईश्चराईजर लावून झोपा. रोज हा उपाय केल्याने डाग कमी होण्यास मदत होईल. 

मिक्सर कधी भंगार होईल कळणारही नाही; चुकूनही ५ पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नका, ब्लेड खराब होईल

जया किशोरी आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये हा उपाय करतात. या रूटीनमध्ये दोन गोष्टींचा समावेश करा. त्यात एक मॉईश्चरायजर आहे आणि दुसरं सनस्क्रीन. जया किशोरी यांनी बाकीच्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. तुम्ही बेसनाचा घरगुती उपाय कर शकता. 

जया किशोरी यांच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट डाएटवर अवलंबून आहे.  त्या फक्त फ्रुट्स, सॅलेड, शुद्ध सात्विक आहार घेतात. तेलकट किंवा जंक फूडचे सेवन करू नका. खाण्यात सॅलेड्सचे प्रमाण जास्त असल्यास त्वचेचा रंग सुधारतो. तेलकट, जंक फूड आपल्या हेल्थसाठी फारसे चांगले नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. तेल आणि जंक फूड खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग येतात म्हणूनच सात्विक आहार घेण्याची सवय ठेवा.

Web Title: Jaya Kishori's Beauty Secret : Jaya Kishori Beauty Secret Effective Home Remedies For Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.