कथावाचक जया किशोरी (Jaya Kishori) आपल्या कथांसाठी आणि भजनांसाठी प्रसिद्ध आहेत. तसंच त्या त्यांच्या चमकदार त्वचेमुळेही चर्चेत असतात. आपली त्वचा सुंदर चमकदार दिसावी असं प्रत्येकालाच वाटतं. जया किशोरी आपल्या त्वचेवर नक्की काय लावतात असा प्रश्न अनेकांना पडतो.
त्यांनी आपल्या एका मुलाखतीत याबाबत अधिक माहिती दिली. ज्यात त्यांनी आपल्या स्किन केअर रूटीनबद्दल सांगितलं. त्याचं स्किन केअर रूटीन फॉलो केलं तर तुमचा बराचवेळ वाचेल. कथावाचक जया किशोरी आपल्या त्वचेला नेमकं काय लावतात याबाबत समजून घेऊ. (jaya Kishori Shared How She Uses A Homemade Rice Water Spray For Glowing Skin)
जया किशोरी काय सांगतात?
आपल्या एका मुलाखतीत जया किशोरी यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की माझ्या स्किन केअर रूटीनमध्ये काही खास पदार्थांचा समावेश आहे. यात त्यांनी सोप्या ४ स्टेप्स सांगितल्या आहेत. या रूटीनमध्ये त्यांनी एका खास स्प्रे बद्दलही सांगितले. हा स्प्रे फक्त २ मिनिटांत तयार होतो. ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. त्वचेची काळजी कशी घ्यायची याच्या काही सोप्या टिप्स पाहूया.
स्किन एक्सफोलिएट करा
यासाठी तुम्हाला बाजारातील कोणत्याही केमिकल्सयुक्त स्क्रबची गरज नाही. हे स्क्रब तुम्ही घरच्याघरी बनवू शकता. यासाठी एका वाटीत बेसन, चिमूटभर हळद आणि दही मिसळा. हे तिन्ही पदार्थ एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर १० ते १५ मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायामुळे चेहऱ्यावरची घाण आणि डेड स्किन सेल्स साफ होण्यास मदत होईल.
मोठा दागिना परवडत नाही, बायकोसाठी पाडव्याला घ्या १ ग्रॅम सोन्यात नाजूक अंगठी; १० डिझाइन्स
तांदूळाच्या पाण्याचा स्प्रे
हा स्प्रे घरच्याघरी तयार करण्यासाठी तांदूळ स्वच्छ पाण्यात उकळवून घ्या. नंतर हे पाणी गाळून थंड करून घ्या मग एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे चेहर्यावर शिंपडा. ज्यामुळे त्वचा ग्लोईंग दिसेल. तांदूळाचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी अगदी व्यवस्थित घेऊ शकता. हे टोनर अगदी नैसर्गिक आहे.
१ कप पोह्यांची करा खुसखुशीत चकली; बिना भाजणीच्या चकलीची रेसिपी-चकली फसणार नाही
मॉईश्चरायजर
मॉईश्चरायजर त्वचेसाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे त्वचा मऊ राहते. याशिवाय फाईन लाईन्स, सुरकुत्या येत नाहीत. त्वचेवर जळजळ, खाज येत नाही आणि त्वचेचा रंग सुधारतो. त्वचेला मॉईश्चर मिळतं.
सनस्क्रीन लावा
कोणतंही वातावरण असेल तरी सनस्क्रिन लावायला विसरू नका. त्वचेची सुरक्षा आणि सनबर्नपासून बचावासाठी सनस्क्रीनचाा वापर करा. सनस्क्रीन न लावता जास्तवेळ बाहेर राहिल्यास टॅनिंग येऊ शकतं. याशिवाय इतर स्किनच्या समस्या उद्भवू शकतात.
Web Summary : Katha speaker Jaya Kishori reveals her simple skincare routine for radiant skin. It includes homemade exfoliating scrub, rice water spray, moisturizer, and sunscreen for protection from sun damage. This routine helps to maintain healthy and glowing skin.
Web Summary : कथावाचक जया किशोरी ने चमकदार त्वचा के लिए अपनी सरल स्किनकेयर रूटीन का खुलासा किया। इसमें घर का बना एक्सफोलिएटिंग स्क्रब, चावल के पानी का स्प्रे, मॉइस्चराइजर और धूप से सुरक्षा के लिए सनस्क्रीन शामिल है। यह रूटीन स्वस्थ और चमकदार त्वचा बनाए रखने में मदद करता है।