त्वचेचं सौंदर्य वाढवण्याासठी लोक बाजारात मिळणारी उत्पादनं लावणं पसंत करतात. पण या महागड्या उत्पादनांमुळे चेहऱ्यावर तात्पुरता परीणाम दिसतो आणि त्वचेचा टोन खराब होतो. पण घरगुती पदार्थांमध्येही सौंदर्याचं गुपित दडलेलं आहे. प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी (Jaya Kishori) आपल्या सुंदर त्वचेसाठी ओळखल्या जातात. फॅन्सना जया किशोरीच्या सौंदर्यांचं रहस्य काय असा प्रश्न नेहमी पडलेला असतो. जया किशोरी सोशल मीडियावर बऱ्याच प्रसिद्ध आहेत. जया किशोरी यांना बरेच लोक फॉलो करतात. (Jaya Kishori Uses Besan Dahi Face Pack For Pimples And Acne Free Skin)
जया किशोरी या आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करतात. जया किशोरी यांचे हे घरगुती उपाय कोणते ते समजून घेऊ. जेणेकरून घरगुती उपायांचा वापर करून तुम्हाला सुंदर त्वचा मिळवता येईल. (Jaya Kishori Uses Besan Dahi Face Pack For Pimples And Acne Free Skin)
जया किशोरी यांचे ब्युटी रुटीन काय आहे?
जया किशोरी यांच्या फ्लॉलेस त्वचेचं रहस्य घरगुती उपायांमध्ये लपलेलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्वचेची काळजी घेण्यासाठी त्या कोणतेही कॉस्मेटीक उत्पादनं लावण्यापेक्षा घरगुती उपाय करणं पसंत करतात. जया लहानपणापासूनच आपल्या त्वचेवर दही, बेसनाचा वापर करतात. हा उपाय त्यांच्या त्वचेला ग्लोईंग बनवत नाही तर डागांपासूनही सुरक्षा देतो.
कुकरमध्ये ५ मिनिटांत करा तुरीच्या डाळीचं चवदार वरण; हॉटेलस्टाईल घट्ट डाळ घरीच बनेल
हा घरगुती फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला १ चमचे बेसन, १ मोठा चमचा दही, अर्धा चमचा हळद हे तीन पदार्थ लागतील. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीत २ चमचे बेसन घ्या. त्यात १ मोठा चमचा दही मिसळा. शेवटी चुटकीभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. या पॅकमध्ये तुम्ही मध, मुल्तानी माती मिसळू शकता. पण कोणताही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका.
दिवाळीसाठी ब्लाऊज शिवून घेताय? १० नवीन स्लिव्हज पॅटर्न्स पाहा, स्टालिश-सुंदर लूक येईल
हा फेस पॅक लावण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. नंतर चेहऱ्याला हा पॅक लावा १० ते १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर तसंच ठेवा. सुकल्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवा. नंतर चेहरा पुसून घ्या मग मॉईश्चराईजर लावा. नियमित हा उपाय केल्यानं त्वचेत बदल होईल आणि चेहऱ्यावर तेज येईल.