उन्हाळा म्हटलं की त्वचेच्या अनेक समस्या सतावतात. उन्हाळ्यात आपल्या त्वचेचा थेट संपर्क उन्हाशी आल्यामुळे त्वचेवर त्याचे लहान मोठे बदल अगदी लगेच दिसू लागतात. उन्हाळ्यात (Jaya bachchan Shares Her Grandmothers Home Remedy For Tanning Removal) त्वचेच्या अनेक समस्यांपैकी सर्वात मोठी आणि कॉमन समस्या म्हणजे सन टॅनिंग. या ऋतूंत बहुतेक सगळ्यांनाचं उन्हामुळे सन टॅनिंग होते. सन टॅनिंगमध्ये आपली त्वचा (Viral Tan removal secret of Jaya Bachchan) सूर्यप्रकाशामुळे काळवंडली जाते. त्वचेचा नैसर्गिक रंग बदलून त्वचेवर एक प्रकारचा काळपट थर (Jaya Bachchan's Tan Removal Home Remedy) दिसू लागतो. उन्हात सतत राहिल्यामुळे त्वचेवर होणारे सन टॅनिंग ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे, सन टॅनिंगमुळे त्वचा काळवंडते, निस्तेज दिसते आणि नैसर्गिक चमक हरवते(Instant Tan Removal Home Remedy Shared By Jaya Bachchan).
त्वचेवरील हा काळपट थर लगेच निघता निघत नाही. यासाठी, त्वचेवरील सन टॅनिंग घालवून त्वचेचा रंग पुन्हा पहिल्यासारखा करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अशातच बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी त्वचेवरील सन टॅनिंग काढण्यासाठी एक खास उपाय शेअर केला आहे. सन टॅनिंग काढण्यासाठीचा घरगुती उपाय त्यांना त्यांच्या आजीने सांगितला असल्याचे त्या सांगतात. उन्हामुळे त्वचेला होणारी टॅनिंग आणि त्वचेवरील मळ कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलेला हा घरगुती नैसर्गिक उपाय खूपच फायदेशीर आहे. त्वचेवरील सन टॅनिंग कमी करण्यासाठी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी त्यांच्या आजीने सांगितलेला कोणता उपाय शेअर केला आहे ते पाहूयात...
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी अलीकडेच त्यांना त्यांच्या आजीकडून मिळालेला एक खास सन टॅनिंग रिमूव्हलचा उपाय सांगितला आहे. गव्हाचे पीठ वापरून तयार केलेली ही पेस्ट उन्हामुळे आलेले टॅनिंग आणि त्वचेवरील मळ काही क्षणातच दूर करते. नैसर्गिक पदार्थ वापरुन तयार केलेला हा देसी उपाय प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. हा नैसर्गिक उपाय तुमच्या त्वचेला चमकदार आणि आतून स्वच्छ करतो ते ही कोणत्याही केमिकलशिवाय!
सारा तेंडुलकर, केसांसाठी करते तिच्या आईने सांगितलेला पारंपरिक उपाय - पाहा तिचे हेअर केअर सिक्रेट!
हा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. दुधावरची साय / मलई - १ टेबलस्पून
२. हळद - १ टेबलस्पून
३. गव्हाचे पीठ - २ टेबलस्पून
कृती :-
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, हळद आणि दुधावरची साय घ्यावी. आता हे तिन्ही पदार्थ एकत्रितपणे चमच्याने कालवून घ्यावे. या मिश्रणाची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
आलिया भटसारखे देखणे हात हवेत? काखेतील काळेपणा आणि वॅक्सिंगसाठी करा एकच खास उपाय, स्वस्त आणि मस्त
उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...
याचा वापर कसा करावा ?
सगळ्यांत आधी त्वचेच्या ज्या भागावर टॅनिंग झाले आहे त्या भागावर ही तयार पेस्ट लावून घ्यावी. त्यानंतर १० ते १५ मिनिटे थांबून ही पेस्ट हलकीशी सुकू द्यावी. पेस्ट थोडी सुकल्यावर हलकेच हाताने चोळून ही सुकलेली पेस्ट त्वचेवरून काढून घ्यावी. यामुळे सन टॅनिंगमुळे त्वचेवर आलेला काळा थर, मळ, घाण आणि डेड स्किन निघून जाते. अशा परिस्थितीत, गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा स्क्रब उन्हाळ्यात सन टॅनिंग काढण्यासाठी फायदेशीर ठरतो.