Tanning Home Remedies : उन्हामुळे अनेकांना त्वचेवर टॅनिंगची समस्या होते. ज्यामुळे त्वचेवरील ग्लो नाहीसा होतो. उन्हाच्या संपर्कात आल्यानं केवळ चेहराच नाही तर हात-पायावरही टॅनिंग बघायला मिळते. अशात टॅनिंग दूर करण्यासाठी अनेक महागडे क्रीम लावले जातात. पण हे महागडे क्रीम न लावताही तुम्ही कमी खर्चात टॅनिंग दूर करू शकता. यावर प्रसिद्ध स्किन आणि हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यानी एक उपाय सांगितला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जावेद हबीब यांनी सांगितलं की, कशाप्रकारे घरात ठेवलेली एक गोष्ट कॉफीमध्ये मिक्स करून लावल्यास टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते.
जावेद हबीब सांगतात की, जर उन्हामुळे तुमचा चेहरा टॅन आणि डल झाला असेल तर कॉफी पावडरमध्ये मध टाकून चेहऱ्यावर लावू शकता. या मिश्रणानं टॅनिंग तर दूर होईल, सोबतच चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो सुद्धा येईल.
कसं लावाल?
कॉफी पावडरचा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा कॉफी पावडरमध्ये थोडं मध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर हलक्या हातानं चेहऱ्याची मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यनं टॅनिंग दूर होईल. तसेच चेहरा मुलायम आणि चमकदार दिसू लागेल.
टॅनिंग दूर करण्याचे इतर उपाय
जावेद हबीब यांनी सांगितलेल्या उपायासोबतच तुम्ही टॅनिंग दूर करण्यासाठी एक वेगळाही उपाय ट्राय करू शकता. टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन आणि दह्यात चिमुटभर हळद टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं मसाज करा. नंतर चेहरा धुवून घ्या. यानं टॅनिंग दूर होईल आणि चेहऱ्यावर ग्लो येईल.