प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट्स जावेह हबीब (Jawed Habib) यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये केसांना लांबसडक आणि दाट, मजबूत बनवण्यासाठी एका नैसर्गिक उपायाची शिफारस केली आहे. केसांना कोणतं तेल लावायचं, कोणतं तेल लावल्यानं केस दाट होतात. केस गळणं थांबवण्यासाठी तेल कोणतं लावायचं असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. जावेद हबीब यांनी केसांना मुलेठीचं तेल लावण्याचा सल्ला दिला आहे. केसांच्या आरोग्यासाठी मुलेठीचं तेल कसं फायदेशीर ठरतं. याबाबत जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Jawed Habib Suggests Apply Mulethi Oil On Hairs To Get Long Hairs)
मुलेठीच्या तेलाचे केसांना काय फायदे होतात?
मुलेठी हा केवळ घसा खवखवणं आणि सर्दी खोकल्यावरचा उपाय नसून केसांसाठी एक वरदान आहे. जावेद हबीब यांच्यामते मुलेठीमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देता. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस गळणं कमी होतं. मुलेठीमध्ये असलेले ग्लिसरायझिन नावाचे घटक केसांच्या कुपांना उत्तेजित करतात. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केस वाढवण्यास मदत होते. लांबसडक केस मिळवण्यासाठी हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे.
ताण-तणाव आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत होतात. मुलेठीचं तेल केसांच्या मुळांना बळकट करून अकाली केस गळती थांबवण्यास मदत करते. मुलेठीमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणधर्म असतात जे डोक्यातील कोंडा आणि खाज कमी करण्यास प्रभावी ठरतात. निरोगी टाळू असल्याशिवाय दाट केस वाढू शकत नाहीत.
कितीही चाला पोट कमीच होत नाही? चालण्याची योग्य पद्धत पाहा, भराभर घटेल चरबी
हे तेल केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करते. ज्यामुळे केसांना एक खास चमक मिळते आणि ते मुलायम होतात. मुलेठीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे टाळूला होणारी जळजळ, लालसरपणा किंवा तीव्र खाज कमी होते यामुळे टाळू शांत राहते आणि केसांची वाढ चांगली होते. ज्या लोकांची टाळू खूप तेलकट असते त्यांच्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. ते टाळूतील तेलाची अतिरिक्त निर्मिती नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे केस दीर्घकाळ स्वच्छ राहतात.
मुलेठीचं तेल कसं वापरावं?
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आठवड्यातून २ वेळा मुलेठीच्या तेलानं टाळूची हलक्या हातानं मालिश करा. ज्यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित जाईल. जावेद हबीब यांच्यासारख्या तज्ज्ञांनी शिफारस केलेला हा उपाय निश्चितच तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.
Web Summary : Jawed Habib recommends Mulethi oil for longer, stronger hair. Mulethi nourishes hair roots, reduces hair fall, and stimulates growth. It also combats dandruff and conditions hair.
Web Summary : जावेद हबीब लंबे, मजबूत बालों के लिए मुलेठी तेल की सलाह देते हैं। मुलेठी बालों की जड़ों को पोषण देता है, बालों का झड़ना कम करता है और विकास को उत्तेजित करता है। यह रूसी से भी लड़ता है और बालों को कंडीशन करता है।