प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) नेहमीच केसांच्या आरोग्याबाबत सोशल मीडिया युजर्सना माहिती देत असतात. तसंच त्यांच्या चाहत्यांच्या प्रश्नांचे निरसनसुद्धा ते सोशल मीडिया रिल्सच्या माध्यमातून करतात. आजकाल केस गळण्याची समस्या खूपच कॉमन झाली आहे. (What Is Correct Way To Apply Shampoo On Your Hairs)
केस गळायला लागले की काही केल्या थांबतच नाही. केस चांगले राहण्यासाठी तुम्ही केस विंचरता, केस कसे धुता, किती वेळा धुता हे फार महत्वाचे असते. केस धुताना शॅम्पूचा वापर कसा करावा याबाबत प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Jawed Habib Says Right Way To Apply Shampoo To Hairs)
५ मिनिटं शॅम्पू लावून ठेवण्याचे फायदे
आपण शॅम्पू लावल्यानंतर केस लगेच धुवून टाकतो. मात्र जावेद हबीब यांच्या मते शॅम्पू केसांमध्ये ५ मिनिटं राहिल्यामुळे त्यातील घटक टाळूवर साचलेला कोंडा आणि डेड स्किन मऊ करून घाण काढून टाकण्यास मदत करतात. केसांच्या मुळाशी साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल पूर्णपणे निघून जाण्यासाठी शॅम्पूला थोडा वेळ मिळतो. ज्यामुळे केस अधिक चांगले स्वच्छ होतात.
केस धुण्याची योग्य पद्धत
सगळ्यात आधी केस पूर्णपणे ओले करा. शॅम्पू हातावर घेऊन तो टाळूवर लावा आणि बोटांच्या टोकांनी हलका मसाज करा. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे शॅम्पूचा फेस केसांमध्ये कमीत कमी ५ मिनिटं तरी राहू द्या. ५ मिनिटांनी साध्या पाण्यानं केस स्वच्छ धुवा.
जर तुमची स्किन खूपच सेंसिटिव्ह असेल तर तुम्ही खूप स्ट्राँग केमिकल असलेला शॅम्पू वापरत असाल तर ५ मिनिटं थांबण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा किंवा कमी वेळ केसांवर शॅम्पू लावून ठेवा. हर्बल किंवा माईल्ड शॅम्पूसाठी ही पद्धत अधिक प्रभावी ठरते.
शॅम्पू लावण्यापूर्वी केस कोमट किंवा साध्या पाण्यानं पूर्णपणे ओले करा. केस कोरडे असतानाच शॅम्पू लावल्यास तो नीट पसरत नाही आणि केसांमधील ओलावा काढून घेतो. कधीही शॅम्पू थेट बाटलीतून काढून टाळूवरती नका. आधी तळ हातावर थोडा शॅम्पू घ्या. त्यात थोडं पाणी मिसळून फेस करा.
मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज
यामुळे शॅम्पूतील केमिकल्सची तीव्रता कमी होते आणि ती केसांवर समान रितीनं पसरते. बोटांच्या टोकांनी गोलाकार हालचालीत टाळूवर हलका मसाज करा. केसांच्या टोकांना वेगळा शॅम्पू लावण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही टाळू धूत असता तेव्हा उतरणारा फेस केसांची टोकं स्वच्छ करण्यासाठी पुरेसा असतो.
Web Summary : Hair expert Jawed Habib advises leaving shampoo on for five minutes to loosen scalp dirt and oil. Apply diluted shampoo to wet hair, massage gently, and rinse thoroughly for cleaner, healthier hair. Patch test if you have sensitive skin.
Web Summary : हेयर एक्सपर्ट जावेद हबीब स्कैल्प की गंदगी और तेल को ढीला करने के लिए शैम्पू को पांच मिनट तक रखने की सलाह देते हैं। गीले बालों पर पतला शैम्पू लगाएं, धीरे से मालिश करें और साफ, स्वस्थ बालों के लिए अच्छी तरह से धो लें। संवेदनशील त्वचा होने पर पैच टेस्ट करें।