Join us

अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:21 IST

फोन स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे त्वचेचं मोठं नुकसान होत आहे.

फोनच्या स्क्रीनपासून दूर राहणं आता सर्वांसाठीच कठीण झालं आहे. ऑफिसचं काम असो किंवा मनोरंजन असो फोनचा वापर हमखास केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की फोनच्या स्क्रीनचा त्वचेवरही परिणाम होतो. फोन स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे त्वचेचं मोठं नुकसान होत आहे. ही ब्लू लाईट किंवा हाय एनर्जी व्हिजिबल लाईट ही सूर्यापासून निघणाऱ्या यूव्ही रेजपेक्षाही त्वचेत खोलवर जातात. अशा परिस्थितीत, डर्माप्युरिटीजच्या सीईओ मिस ललिता आर्या यांनी फोनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटपासून त्वचेचं संरक्षण कसं करायचं हे सांगितलं आहे.

रिसर्चनुसार, फोनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे इंफ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतो. यामुळे त्वचा कोरडी दिसते, चमक जाते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात आणि त्वचेचा रंग थोडा बदलू शकतो. जर तुम्हालाही असं वाटत असेल की, घरी राहून तुमच्या त्वचेची चमक कमी झाली आहे, तर याचं मुख्य कारण फोनमधून निघणारी ब्लू लाईट असू शकते.

ब्लू लाईटपासून 'असं' करा त्वचेचं संरक्षण

- ब्लू लाईटपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी, अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या स्कीन केअरचा वापर करा. व्हिटॅमिन सी आणि नियासीनामाइड तुमच्या स्कीन केअर रूटीनचा भाग बनवा.

- तुम्ही बाहेर जा किंवा घरी जा पण चेहऱ्यावर सनस्क्रीन नक्कीच लावा. सनस्क्रीन केवळ सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण करत नाही, तर ती बल्ब आणि फोनमधून निघणाऱ्या हानिकारक प्रकाशापासून त्वचेचं रक्षण करते.

- तुमच्या फोनची स्क्रीन लाईट नाईट मोडमध्ये ठेवा. तसेच जास्त वेळ फोनमध्ये व्यस्त राहणं टाळा. फोन वापरताना ब्रेक घेत राहा.

- त्वचेला ब्लू लाईटपासून वाचवण्यासाठी आणि त्वचेवर ब्लू लाईटचा परिणाम किंवा नुकसान कमी करण्यासाठी, तुमच्या आहारात अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करा. बेरी, ग्रीन टी आणि हिरव्या पालेभाज्या अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.

कोणते उपचार फायदेशीर ठरू शकतात?

जर त्वचेचं ब्लू लाईटमुळे नुकसान झालं असेल, तर काही उपचार फायदेशीर ठरू शकतात. या क्लिनिकल उपचारांमुळे त्वचेचं नुकसान कमी होतं आणि त्वचेची हरवलेली चमक परत मिळते. निस्तेज किंवा डॅमेज त्वचेला पुन्हा जिवंत करण्यासाठी त्वचेच्या डिटॉक्ससाठी आयव्ही ड्रिप, डीप हायड्रेशनसाठी एडव्हान्स हायड्रा फेशियल आणि लेसर रिजुवनेशन सेशन सारख्या नॉन-इनवेसिव्ह थेरपी घेतल्या जाऊ शकतात. मात्र काहीही करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्समोबाइलस्मार्टफोनत्वचेची काळजी