Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागडे शाम्पू आणण्यापेक्षा वापरा शिकेकाईच्या शेंगा , केस मानतील आभार आणि वाढतील भरभर ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2026 14:29 IST

Instead of buying expensive shampoos, use shikekai, your hair will grow : केसांसाठी शिकेकाई नक्की वापरा. पाहा योग्य पद्धत.

पूर्वीच्या काळात केस धुण्यासाठी रासायनिक शॅम्पूपेक्षा नैसर्गिक गोष्टींना अधिक महत्त्व दिले जात होते. त्यामध्ये शिकेकाईचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. आजही अनेक जण केस मजबूत, स्वच्छ आणि नैसर्गिकरीत्या चमकदार ठेवण्यासाठी शिकेकाई वापरतात.(Instead of buying expensive shampoos, use shikekai, your hair will grow ) शिकेकाईच्या शेंगांमध्ये केसांची स्वच्छता करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. योग्य पद्धतीने वापरल्यास केसांमधील तेलकटपणा, कोंडा आणि घाण कमी करण्यास मदत होऊ शकते. विकतचे शिकेकाईचे शाम्पू वापरण्याऐवजी त्याच्या शेंगा घरी आणून थेट तेच वापरले तर आरोग्यासाठी जास्त चांगले ठरते. 

शिकेकाईच्या वाळलेल्या शेंगा बाजारात सहज मिळतात. या शेंगा थेट केसांवर वापरण्याऐवजी त्याची योग्य तयारी करणे महत्त्वाचे असते. सर्वात आधी शिकेकाईच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर त्या रात्रीभर पाण्यात भिजत ठेवाव्यात. भिजवल्यानंतर शेंगा मऊ होतात आणि त्यातील नैसर्गिक घटक पाण्यात उतरतात. दुसऱ्या दिवशी हेच पाणी थोडे उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यावर शेंगा हाताने मऊ करून त्याचा अर्क गाळून घ्यावा.

हा तयार झालेला द्रव केस धुण्यासाठी वापरता येतो. केस आधी पाण्याने ओले करून मग शिकेकाईचा अर्क टाळू आणि केसांवर हलक्या हाताने लावावा. काही मिनिटे मसाज केल्याने टाळूवरील घाण आणि अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावेत. शिकेकाई वापरताना डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते, कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते.

अनेक जण शिकेकाईसोबत रिठा आणि आवळाही वापरतात. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यास केस अधिक मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होऊ शकते. काही घरांमध्ये शिकेकाईची पावडर करूनही ती वापरली जाते. मात्र पावडर वापरताना ती खूप घट्ट किंवा खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. शिकेकाईचा वापर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करणे पुरेसे ठरू शकते. सतत रासायनिक पदार्थ वापरण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेण्यासाठी हा एक पारंपरिक उपाय मानला जातो. मात्र कोणतीही नवीन गोष्ट वापरण्यापूर्वी त्वचेची किंवा टाळूची संवेदनशीलता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

योग्य पद्धतीने शिकेकाई वापरल्यास केस स्वच्छ राहण्यास, मऊ आणि नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अनेक घरांमध्ये आजही शिकेकाईला विशेष महत्त्व दिले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Use Shikakai for Healthy Hair Instead of Expensive Shampoos

Web Summary : Shikakai, a natural cleanser, promotes strong, clean, and shiny hair. Soak, boil, and use the extract to wash hair, reducing oiliness and dandruff. Add reetha and amla for extra softness. A traditional, gentler alternative to chemical shampoos.
टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडीहेल्थ टिप्सआरोग्यघरगुती उपाय