साडी फक्त वस्त्र नाही साडी ही प्रत्येक महिलेसाठी जपून ठेवायचीच गोष्ट असते. आईची साडी, आजीची साडी त्यात मायेची उब असते असे मानले जाते. साडी वर्षानुवर्षे वापरली जाते. आठवण म्हणूनही साडीची जपणूक केली जाते. तिचा रंग, चमक आणि मऊपणा कायम राहावा, यासाठी साडी धुताना काळजी घेणे आवश्यक आहे. (If you wash a saree like this, it will look new year after year. Forget about soaking the saree in detergent or dry cleaning it.)चुकीच्या पद्धतीने धुतल्यास साडीचा रंग उडतो, कापड खराब होते आणि ती लवकर जुनी दिसू लागते. खाली दिलेल्या काही सोप्या घरगुती टिप्स वापरल्यास साडी नेहमीसारखीच सुंदर राहील. भेट म्हणून मिळालेली साडी छान जपून ठेवा. तसेच स्वच्छही ठेवा.
१. साडी धुण्यासाठी शाम्पू वापरा:
डिटर्जंट पावडर साडीच्या तंतूंवर परिणाम करते आणि रंग फिका करते. त्याऐवजी एका बादली पाण्यात थोडासा माइल्ड शाम्पू घ्यायचा आणि साडी १० मिनिटांसाठी त्यात भिजवून ठेवा. नंतर हलक्या हाताने धुवा. यामुळे साडी स्वच्छ होते आणि तिचा रंग व कापड दोन्ही टिकून राहते. शाम्पूही साधाच वापरा. फार वेगळा हवा असे काही नाही. रोजच्या वापरातला शाम्पू वापरा.
२. मीठ पाण्याचा वापर:
साडीचा रंग निघू नये म्हणून पहिल्यांदा धुण्यापूर्वी ती मिठाच्या पाण्यात भिजवा. एका बादली पाण्यात दोन चमचे मीठ घालून १५ मिनिटांसाठी साडी भिजवून ठेवा. मीठ रंगाला स्थिरता देते आणि पुढे धुताना तो फिका होत नाही. बरेचदा नव्या साड्यांचा रंग जातो. मिठाच्या पाण्यामुळे झीज थांबवता येते.
३. गरम पाण्याचा वापर टाळा:
साडी नेहमी थंड किंवा कोमट पाण्यात धुवावी. गरम पाणी वापरल्यास तंतू सैल होतात आणि कापडाची चमक कमी होते. त्यामुळे गरम पाणी न वापरता कोमट पाणीच वापरावे. गरम पाण्यामुळे साडीचा धागा कमकुवत होतो.
४. वाळवताना सावलीत ठेवा:
साडी थेट उन्हात वाळवू नये. त्यामुळे रंग फिकट होतो. सावलीत वाळवा. वाळायला जास्त वेळ लागू द्या. भरपूर उन्हात अजिबात वाळवू नका. हवेशीर ठिकाणी वालत घाला. असे केल्यामुळे साडीचा रंग टिकून राहतो.
५. इस्त्री करताना काळजी घ्या :
साडीवर थेट गरम इस्त्री फिरवू नका. त्याऐवजी वर एक पातळ कापड ठेवून इस्त्री करा, त्यामुळे साडीचा मऊपणा आणि चमक दोन्ही टिकून राहतात. साडी छान सुंदर राहते.