lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > कलर थेरपी: तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालताय? त्या रंगावर तुमचा मूड ठरतो!

कलर थेरपी: तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालताय? त्या रंगावर तुमचा मूड ठरतो!

प्रत्येक रंग हा चांगलाच असतो. सर्व रंगाचे कपडे वापरायला हवेत. फक्त रंग हे आपल्या मूडवर आणि भावनांवर परिणाम करतात. त्यामुळे रंगांचे स्वभाव समजून घेवून त्या त्या रंगाचे कपडे निवडायला हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:02 PM2021-03-29T16:02:12+5:302021-03-29T16:24:35+5:30

प्रत्येक रंग हा चांगलाच असतो. सर्व रंगाचे कपडे वापरायला हवेत. फक्त रंग हे आपल्या मूडवर आणि भावनांवर परिणाम करतात. त्यामुळे रंगांचे स्वभाव समजून घेवून त्या त्या रंगाचे कपडे निवडायला हवेत.

If you want to keep your mood good, decide what color to wear first! | कलर थेरपी: तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालताय? त्या रंगावर तुमचा मूड ठरतो!

कलर थेरपी: तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालताय? त्या रंगावर तुमचा मूड ठरतो!

Highlightsरंग हे आपल्या भावनांवर , आपल्या मूडवर विविध प्रकारे परिणाम करतात. आपला मूड हा छान ठेवायचा असेल तर आपण परिधान करत असलेल्या कपड्यांचे रंग महत्त्वाची भूमिका बजावतात.आपण कोणत्या वेळी , कोणत्या कारणासाठी कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत याचेही काही नियम आहे.आज कोणत्या रंगाचे कपडे घालू हे कपाटातल्या कपड्यांकडे बघून न ठरवता खिडकी उघडून बाहेर डोकावून ठरवावं.

-  प्राची खाडे

ऑफिससाठी तयार व्हायचं आहे, बाहेर दूकानात खरेदीला जायचं आहे, दवाखान्यात जायचं आहे किंवा फिरायला जायचं आहे , तयार होताना प्रत्येक वेळी प्रश्न पडतो की काय घालायचं? आज कोणत्या रंगाचा ड्रेस् किंवा साडी घालायची? कधी कधी हे प्रश्न आपल्या तयारीचा खूप वेळ खातात. तर कधी कधी एवढा वेळ घेऊन निवडलेला पर्याय आपला मूड खराब करु शकतो.
हे असं का होतं हे माहीत आहे का?
 कारण रंग. रंग हे आपल्या भावनांवर , आपल्या मूडवर विविध प्रकारे परिणाम करतात. आपला मूड हा छान ठेवायचा असेल तर आपण परिधान करत असलेल्या कपड्यांचे रंग महत्त्वाची भूमिका बजावतात. भारत हा जगातला असा देश आहे की येथे स्त्रियांनी अमूकच रंगाचे कपडे वापरायला हवेत आणि पुरुषांनी अमूक रंग टाळायला हवेत असे काही बंधंनं नाही. आपल्याकडे स्त्रिया, पुरुष आपल्या आवडीप्रमाणे कपड्यांचे रंग निवडू शकतात. फक्त एक आहे की काही रंगांबाबत आपल्याकडे अंधश्रध्दा आहेत. अमूक कार्यक्रमासाठी अमूकच रंगाचे कपडे हवेत किंवा अमूक रंगाचे कपडे घालायला नकोत .. त्यामूळे मूक्तपणे कपड्यांची निवड करणं अवघड जातं. पण हे असं करुन आपण रंगावर अन्याय करत असतो. खरंतर प्रत्येक रंग हा चांगलाच असतो. सर्व रंगाचे कपडे वापरायला हवेत. फक्त रंग हे आपल्या मूडवर आणि भावनांवर परिणाम करतात. त्यामूळे रंगांचे स्वभाव समजून घेवून त्या त्या रंगाचे कपडे निवडायला हवेत. कपड्यांच्या रंगासोबतच आपण त्यावर घालणाऱ्या अ‍ॅक्सेसरींचा रंग कोणता असणार आहे याचा विचार केल्यास रंगांचा समतोल साधता येतो.


 

कोणता रंग काय सांगतो?
- पांढरा- पांढरा रंग हा स्वच्छतेचं आणि नवीन सूरुवातीचं प्रतीक आहे. आपल्याला जेव्हा दिवसाची सूरुवात नव्या कोऱ्या पाटीसारखी करायची असते तेव्हा पांढऱ्या रंगाचे कपडे योग्य ठरतात. धूवून धूवून विटलेला पांढरा रंग मात्र नको, पांढरा रंग हा ताजा तवाना लूक देतो.
- काळा- जेव्हा इतरांमधे उठून दिसण्याची आपली इच्छा नसते तेव्हा काळ्या रंगाचे कपडे चालतात. कारण काळा रंग ही इतरांमधे तूम्हाला वेगळे उठून दिसू देत नाही. पण जेव्हा आपल्याला इतरांमधे उठून दिसावंसं वाटत असेल तेव्हा काळ्या रंगाचे कपडे टाळायला हवेत.
- लाल- लाल रंग हा प्रभावशाली रंग असतो. ताकदवान रंग असतो., जेव्हा आपल्यातला आत्मविश्वास दाखवायचा असतो, आपली ओळख इतरांवर ठसवायची असते तेव्हा लाल रंगाचे कपडे चांगले मदत करतात. पण आपण घातलेला लाल रंग हा समोरच्यात जर आत्मविश्वास कमी असेल तर त्यांच्यावर वरचढ ठरु शकतो. त्यामूळे आपल्याला कूठे, कोणासमोर जायचे आहे त्याचा विचार करुन लाल रंगाचे कपडे निवडावेत.
- निळा- निळा हा प्रामूख्याने शांत रंग आहे. मनाला शांतता देणारा रंग आहे. शाई किंवा गडद निळा रंग हा मनाला आल्हाद आणि समाधान देणारा रंग आहे. फिकट निळा रंग हा आपला मूड आनंदी करण्याचं मोठं काम करतो. त्यामूळे ज्या दिवशी उदास वाटत असेल त्या दिवशी मूद्दाम निळ्या रंगाचे किंवा निळ्या छटांचे कपडे वापरावेत.
- हिरवा- वसंत ॠतू, निसर्ग आणि नवीन सूरुवातीचा प्रतिनिधी म्हणजे हिरवा रंग. जेव्हा नवीन काही करायची इच्छा असाते तेव्हा गडद किंवा फिकट हिरव्या रंगाचे कपडे घातले तर आपल्या मनातल्या उद्देशाला हिरव्या रंगाची मदत होते.


- पिवळा- जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्यातल्या आतल्या ताकदीची गरज असते तेव्हा पिवळ्या रंगाचे कपडे आवर्जून घालावेत. जे गूण सूर्याचे असतात तेच गूण पिवळ्या रंगाचे असतात. पिवळा रंग आश्वासकता, सकारात्मकता आणि उमेद देतो. पिवळ्या रंगाच्य सर्व छटा आणि सोनेरी रंग तूम्हाला आनंदी करतो. तूमच्यातली ऊर्जा वाढवतो.
- नारिंगी- हा रंग म्हणजे ऊर्जेचं प्रतीक आहे. नारिंगी रंगात खेळकरपणा, मजेचा मूड दडलेला आहे. त्यामूळे नारिंगी रंगाचे कपडे आपल्याला खेळकर आणि सर्जकही बनवतात.
- जांभळा- इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटतं तेव्हा जांभळ्या रंगाचे कपडे घातले जातात. इतरांपेक्षा वेगळं आणि उठून दिसण्यासाठी जांभळ्या रंगाच्या कपड्यांची निवड करावी. बर्गण्डी हा रंग म्हणजे राजेशाही रंग आहे. हा रंग तुम्हाला चारचौघात वेगळेपण देतो. लव्हेण्डर किंवा फिकट जांभाळ्या रंगाचे कपडे तुम्हाला अंतर्मुख बनवतात. या रंगाला अध्यात्मिकतेचा स्पर्श आहे.
- गुलाबी- गुलाबी रंग हा करुणा आणि मनाच्या मोकळेपणाच रंग आहे. स्त्री असो किंवा पूरुष जे गुलाबी रंगाचे कपडे घालतात तेव्हा इतरांना ही व्यक्ती खूप समजूतदार आहे , प्रेमळ आहे याची जाणीव होते. स्वत:शी आणि इतरांशी आपण जोडलेलो असू ही इच्छा होईल तेव्हा गूलाबी रंगाचे कपडे वापरावेत.
काळ-वेळ-स्थळ आणि रंग
रंगांना स्वभाव असतो. आणि रंग आपल्या स्वभावावर , मूडवर आपल्या मनासिकतेवर परिणाम करतात हे शास्त्रीयरित्या सिध्द झालेलं आहे.
पण आपण कोणत्या वेळी , कोणत्या कारणासाठी कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत याचेही काही नियम आहे. देशानुसार, शहर, गावानुसार हवामान बदलतं. बऱ्याच जणांकडे ॠतूनूसार कपड्यांचं कलेक्शन असतं. पण हल्ली ॠतूतील दिवस एकसारखे नसतात. ऐन उन्हाळ्यातही कधी कधी पावसाळी स्थिती होते तर कधी कधी भर पावसाळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. तेव्व्हा कपड्यांचे रंग निवडताना बाहेरचं वातावरण कसं आहे याचा विचार करुन कपड्यांचे रंग निवडावेत.

एक सोपी युक्ती
आज कोणत्या रंगाचे कपडे घालू हे कपाटातल्या कपड्यांकडे बघून न ठरवता खिडकी उघडून बाहेर डोकावून ठरवावं. उदा. पावसाळ्यात सर्वत्र हिरवा, मातकट किंवा करडे रंग दिसतत. तेव्हा आजूबाजूला जो रंग नाही दिसत तो निवडावा. म्हणून पावसाळ्यात गडद पिवळा, नारिंगी, गुलाबी या रंगाचे कपडे शोभून दिसतात आणि आपला मूड छान ठेवतात. आपल्याला आनंदी करतात.
रंग हे आनंदच देतात. पण जाणीवपूर्वक रंगाची केलेली निवड हे मनाला आनंदी करतात हेच खरं.

(लेखिका स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर आहेत. )

Web Title: If you want to keep your mood good, decide what color to wear first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.